शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

उसतोड मजुरांची पिकअप खड्ड्यात कोसळली; एक मजूर ठार, ९ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 18:57 IST

जमालवाडी तांड्याजवळील चढावर पिकअप वर न जाता सरळ मागे येऊन खोल खड्ड्यात उलटली.

खुलताबाद: ऊस तोडणीनंतर मजुरांना घेऊन जाणारी पिकअप गाडी उलटून एक मजूर ठार तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी रात्री २ वाजेच्या दरम्यान जमालवाडी तांड्याजवळ झाला. या प्रकरणी चालकास अटक करण्यात आली आहे. 

जमालवाडी तांडा येथील २१ मजूर उसतोडणीसाठी फुलंब्री परिसरात रविवारी गेले होते. तोडणीनंतर रात्री उशिरा मजूर पिकअपमधून  ( क्रमांक एमएच २० सीटी ३८२५ ) तांड्यावर परत चाले होते. यावेळी चालक फारूख अकबर पठाण ( रा. खांडीपिपंळगाव)  याने पिकअपमध्ये दोन ते तीन टन चारा भरला होता. त्यावर सर्व २१ मजूर बसून प्रवास करत होते. 

रात्री दोन वाजता जमालवाडी तांड्याजवळील चढावर पिकअप वर न जाता सरळ मागे येऊन खोल खड्ड्यात उलटली. यात प्रताप दिपचंद राठोड ( ५५) हा मजूर जागीच ठार झाला. तर गणेश रूपचंद राठोड, आरती गणेश राठोड, हरीचंद भावसिंग राठोड, राजू बद्दू राठोड, संतोष जोधू राठोड, सरिता संतोष राठोड, सुभाष बद्दू राठोड, वनसिंग सुकलाल राठोड, वनिता सुभाष राठोड हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहे. 

या प्रकरणी खुलताबाद पोलीसांनी पंचनामा करून आरोपी चालक फारूख अकबर पठाण यास अटक केली आहे. मयत प्रताप दिपचंद राठोड याच्या मृतदेहाचे खुलताबाद ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून दुपारी जमालवाडी तांडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादDeathमृत्यूSugar factoryसाखर कारखाने