निवडणुकीचे वारे; जिल्हा परिषद, पंचायत समिती गट, गणांची संख्या मराठवाड्यात वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 15:18 IST2025-07-22T15:13:16+5:302025-07-22T15:18:02+5:30

मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा केल्यानंतर निवडणूक आयोग सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीत आहे.

The number of Zilla Parishads, Panchayat Samiti groups, and ganas increased in Marathwada. | निवडणुकीचे वारे; जिल्हा परिषद, पंचायत समिती गट, गणांची संख्या मराठवाड्यात वाढली

निवडणुकीचे वारे; जिल्हा परिषद, पंचायत समिती गट, गणांची संख्या मराठवाड्यात वाढली

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात जि. प. गट व पं. स.ची प्रभाग रचना झाली. त्यावर आक्षेप नोंदविण्याची मुदतही सोमवारी संपली. विभागात जि. प.चे सहा गट तर पं. स.चे १२ गण वाढले आहेत. त्यानुसार प्रभाग रचना करण्यात आली आहे.

२०२० पासून आजवर विभागातील ८ जि. प.च्या व ७६ पं. स. निवडणुकांचा कार्यकाळ टप्प्याटप्प्याने संपला. त्यावर प्रशासक होते. मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा केल्यानंतर निवडणूक आयोग सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार विभागाची लोकसंख्या १ कोटी ८७ लाख ३७ हजार ७३२ आहे. त्याआधारे प्रारूप गट व गण रचना केलेली आहे. विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात १ कोटी ५६ लाख ३६ हजार ४६४ मतदार होते. २०११ची लोकसंख्या आणि डिसेंबर २०२४ पर्यंतची मतदारसंख्या यात ३१ लाख १ हजार २६८ इतका फरक आहे.

छत्रपती संभाजीनगर
जि. प. गट : ६३
पंचायत समिती गण : १२६
वाढ : गट-१, गण-२

परभणी
जि. प. गट : ५४
पं. स. गण : १०८
वाढ : नाही

जालना
जि. प. गट : ५७
पं. स. गण : ११४
वाढ : गट-१, गण-२

हिंगोली
जि. प. गट : ५२
पं. स. गण : १०४
वाढ : नाही

नांदेड
जि. प. गट : ६५
पं. स. गण : १३०
वाढ : गट-२, गण-४

बीड
जि. प. गट : ६१
पं. स. गण : १२२
वाढ : गट-१, गण-२

लातूर
जि. प. गट : ५९
पं. स. गण : ११८
वाढ : गट-१, गण-२

धाराशिव
जि. प. गट : ५५
पं. स. गण : ११०
वाढ : नाही

मराठवाड्यात १ कोटी ५६ लाख मतदार
विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात १ कोटी ५६ लाख ३६ हजार ४६४ मतदार होते. विभागात २ लाख ४२ हजार ३५२ मतदार वाढले होते. आगामी जि. प., पं. स. निवडणुकीपर्यंत हा आकडा बदललेला असेल. १६,८२६ मतदान केंद्र विधानसभा निवडणुकीत होते.

मतदार संख्येत राजधानी आघाडीवर
छत्रपती संभाजीनगर : ३१ लाख ७६ हजार ८३०
जालना : १६ लाख २३ हजार ९४३
परभणी : १५ लाख ३२ हजार ३०७
हिंगोली : ९ लाख ७४ हजार ५४१
नांदेड : २७ लाख ५१ हजार ६३८
लातूर : २० लाख १६ हजार ९९०
धाराशिव : १३ लाख ९४ हजार १२
बीड : २१ लाख ९७ हजार ८३०
(डिसेंबर २०२४ पर्यंत)

Web Title: The number of Zilla Parishads, Panchayat Samiti groups, and ganas increased in Marathwada.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.