शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

औरंगाबादचे नाव सातासमुद्रापार, विमानांची झेप अवघ्या तीन शहरांसाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 14:33 IST

नव्या शहरांना कनेक्टिव्हिटीची प्रतीक्षा : सध्या सुरू असलेल्या मार्गावरच विमानसेवेचा नव्या एअरलाइन्सचा कल

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : वेरुळ, अजिंठा या जगप्रसिद्ध लेण्यांमुळे औरंगाबाद शहराचे नाव सातासमुद्रापार गेले आहे. मात्र, औरंगाबादहून दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद या तीन शहरांच्या पलीकडे विमानसेवा झेप घेत नसल्याची परिस्थिती आहे. नवीन विमान कंपनीही सध्या सुरू असलेल्या शहरांसाठीच विमानसेवा सुरू करीत आहेत. त्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढीची प्रतीक्षाच औरंगाबादकर करीत आहेत.

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सध्या एअर इंडिया आणि इंडिगोच्या माध्यमातून दिल्ली, मुंबई, हैदराबादसाठी विमानसेवा सुरू आहे. यामध्ये दिल्ली, मुंबईसाठी रोज प्रत्येकी दोन विमानांचे उड्डाण होत आहे. आता फ्लायबिग एअरलाईन्स १५ मे पासून हैदराबाद - औरंगाबाद - हैदराबाद विमानसेवा सुरू करणार आहे. ही विमानसेवा सकाळच्या वेळेत राहणार असल्याने हैदराबाद, तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेत भर पडणार आहे. या तीन शहरांशिवाय इतर शहरांसाठी विमानसेवा कधी सुरू होणार, असा सवाल आहे. नव्या शहरांसाठी औरंगाबादहून किती प्रवासी, प्रतिसाद मिळेल, याबाबत विमान कंपन्यांना प्रश्न पडत आहे. टूर ऑपरेटरच्या पर्यटन परिषदा झाल्यास औरंगाबादचे महत्त्व लक्षात येऊ शकेल. तसे झाल्यास औरंगाबादचे पर्यटन क्षेत्र व्यापक होऊ शकेल, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.

या शहरांसाठी विमानसेवेची प्रतीक्षा ?अहमदाबाद, बंगळुरू, उदयपूरसह पुणे, नागपूर, इंदोर, गोवा, भोपाळ, बोधगया या शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू व्हावी, अशी उद्योजक, व्यापारी, पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्यांची अनेक वर्षांची मागणी आहे. कोरोनापूर्वी अहमदाबाद, बंगळुरू, उदयपूरसाठी विमानसेवा सुरू होती. परंतु, कोरोना विळख्यात बंद पडलेली ही कनेक्टिव्हिटी अजूनही पूर्ववत झालेली नाही.

उडान योजनेत समावेश व्हावाएकाच शहरासाठी औरंगाबादहून रोज एकापेक्षा जास्त विमानसेवा असल्याने तिकिटांचे दर सध्या नियंत्रणात आहेत, ही चांगली बाब आहे. औरंगाबाद हे केंद्र सरकारच्या उडान योजनेत समाविष्ट नाही. त्यामुळे विमान कंपन्यांना येथून नव्या सेवा देण्यास जास्त रस नाही.- अक्षय चाबूकस्वार, सदस्य, औरंगाबाद एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रुप

विमानसेवा वाढीसाठी पाठपुरावाबंगळुरू आणि अहमदाबादला विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी फ्लायबिग आणि एअर इंडियाकडे करण्यात आली आहे. या शहरांना प्रारंभी आठवड्यातून काही दिवसही चालविता येईल. पुणे, उदयपूर विमानसेवेसाठी प्रयत्न सुरू आहेत. उदयपूरची विमानसेवा हिवाळ्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे. आकासा एअरलाइन्सच्या विमानसेवेसाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल.-सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादairplaneविमानtourismपर्यटनAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ