शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

शेळीच्या पैशांवरून वाद अन् मध्यरात्री अख्खं गाव पेटलं; अंभईच्या दंगलीची 'इनसाईड' स्टोरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 16:10 IST

अंभई दंगल प्रकरणी २०६ जणांवर गुन्हे दाखल; १३ जणांना अटक, गावात तणावपूर्ण शांतता

- श्यामकुमार पुरे

सिल्लोड/अंभई: तालुक्यातील अंभई येथे शेळी आणि मटणाच्या पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादाचे पर्यवसन भीषण दंगलीत झाले आहे. या प्रकरणी अजिंठा पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन्ही गटातील एकूण २०६ लोकांविरुद्ध दंगलीचे गुन्हे दाखल केले असून १३ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण असून गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

नेमकी ठिणगी कशी पडली?अंभई येथील शाहरुख पठाण याने कैलास मुंढे यांच्याकडून शेळी विकत घेतली होती. या व्यवहारातील पैशांवरून मंगळवारी दुपारी या दोघांत हाणामारी झाली होती. ग्रामस्थांच्या मध्यस्थीने दुपारी हा वाद मिटला, मात्र सायंकाळी नमाज झाल्यानंतर ७:३० च्या सुमारास परिस्थिती पुन्हा बिघडली. बसस्थानक आणि बाजारपेठ परिसरात दोन्ही गटांचा मोठा जमाव जमला आणि तुफान दगडफेक सुरू झाली.

मोठ्या प्रमाणावर तोडफोड आणि हिंसाचारजमावाने दिसेल त्याला लक्ष्य करून लाठ्या-काठ्या आणि दगडांनी मारहाण केली. यात ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. संतापलेल्या जमावाने अनेक दुकाने फोडली आणि १५ ते २० वाहनांचे नुकसान केले. पुरावे नष्ट करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेही फोडण्यात आले, मात्र त्यापूर्वीच काही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. पोलिसांनी पहाटेपर्यंत 'कोम्बिंग ऑपरेशन' राबवून आरोपींच्या १० मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

राजकारणाची किनार आणि दहशतअंभईतील या दंगलीला स्थानिक राजकारणाचीही किनार असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषद निवडणुकीतील वादातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. यात भाजपचे माजी जिल्हा परिषद उमेदवार त्र्यंबक गव्हाणे यांचा मुलगा विक्रम गव्हाणे हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे गावात महिला आणि मुलांमध्ये प्रचंड दहशत असून बुधवारी अनेक विद्यार्थ्यांनी शाळेत जाणे टाळले. सध्या गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

यांच्यावर झाला गुन्हा दाखल: सरकार पक्षातर्फे पोहेका सांडु सखाराम जाधव यांनी अजिंठा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार वरून अजिंठा पोलिसांनी आरोपी १) शाहरुख जफर पठाण, २) सलमान अहमद पठाण, ३) शाहरुख अहमद पठाण, ४) बाबा जफर पठाण, ५) रिझवान मुबारक शहा,६) सैयद अरबाज अय्युब, ७) आजिम जाफर पठाण, ८) इरशाद शकुर खान, ९) बबलु अली शहा, १०) शाहरुख बाबु शहा, ११) मोबीन कदीर पठाण, १२) एजाज अय्युब पठाण, १३) रमजान नसीरखा पठाण , १४) शेरु युनुस पठाण सर्व रा.अंभई व दुसऱ्या गटातील १५) धनराज भगवान मुंढे ,१६) कैलास भगवान मुंढे,१७) कैलास रुपचंद मुंढे,१८) अजय मोहनसिंग मुंढे, १९) समाधान देवराव सपकाळ, २०) रामसेन चव्हाण , २१) विक्रम त्र्यंबक गव्हाणे , २२) राहुल भगवान ढगे, २३) सागर भगवान ढगे,२४) कैलास रतन शिमरे, २५) अभिजीत धनराज मुंढे, २६) गुरुप्रसाद कैलास बावस्कर सर्व रा अंभई यांच्यासह दोन्ही गटातील प्रत्येकी ९० अशा एकूण २०६ लोकांविरुद्ध पोलिसांनी दंगलीचे गुन्हे दाखल केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Goat money dispute ignites village riot in Ambhai; 206 booked.

Web Summary : A dispute over goat money in Ambhai escalated into a violent riot. Police booked 206 people and arrested 13. The clash involved stone-pelting, property damage, and injuries, fueled by local political tensions. Heavy police presence now maintains order.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर