शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

काळे फासण्याच्या घटनेने आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम; मनोज जरांगे यांची खंत

By बापू सोळुंके | Updated: June 25, 2024 18:18 IST

समाजाला दु:ख होईल असे कृत्य कोणीही करू नये, मनोज जरांगे यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर: आंतरवाली सराटी येथील आंदोलनाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिल्याच्या कारणावरून डॉ. रमेश तारख यांना काळे फासण्याची घटना वाईट आहे. या घटनेने आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम झालं, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी नोंदविली. मोठ्या पोलीस बंदोस्तात आणि मराठा कार्यकर्त्यांच्या वाहनांच्या ताफ्यासोबत ते आंतरवाली सराटीला रवाना झाले.

१३ जुनपासून शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चांगली झाल्याने मंगळवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर ते आंतरवाली सराटीला रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कालच्या घटनेने मराठा आरक्षणाच्या आंदोलनला गालबोट लावण्याचं काम झाले. हे डॉ. तारख यांनाही माहिती आहे. तारख यांनी गावातल्या आंदोलनाला विरोध केला होता, त्यावर आपल्याला बोलायचं नाही. आपण बेधडक स्वभावाचे आहोत, असले प्रकार आपल्याला आवडत नाही. समाजाला दु:ख होईल असे कृत्य कोणीही करू नये. आपल्या आजूबाजुला संपूर्ण समाज वावरतो, यामुळे माझ्या जवळून गेल्यावर कोण काय करते हे आपल्याला माहिती नसते. पण जे झालं ते योग्य नाही, असे काळं फासण्याच्या घटनेवर जरांगे यांनी आवर्जून सांगितले. 

आज गावी जाताना तुमचा पोलीस बंदोबस्त का वाढविला या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, येवलावाल्यांनी तलवारी काढण्याची भाषा केली आहे, याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली असेल, यामुळेच बंदोबस्त दिला असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. मंत्री छगन भुजबळ यांनी जातीवाद वाढविल्याचा पुनरूच्चार जरांगे यांनी केला. मात्र मंत्री शंभूराजे देसाई यांनी १३ जुलैपर्यंत दोन्ही बाजूच्या नेत्यांनी बोलू नये,असे आवाहन केल्याने आपण बोलणार नसल्याचे ते म्हणाले. नेहमीप्रमाणे मी जसा अंतरवालीला जातो तसा जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. धनगर नेते गाव खेड्यातल्या ओबीसी समाजाला विरोधक मानलं नाही आणि मानणार नसल्याचे जरांगे म्हणाले.

जुलैमध्ये पुढील दिशा६ ते १३ जुलै दरम्यानमराठा समाज जागृत करण्यासाठी नियोजन केले आहे. आरक्षण मिळेपर्यंत थांबणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले. हे आंदोलन उभ करण्यासाठी आयुष्य घालवलं आहे. यामुळे यावर कोणी बोललं त्याला उत्तर दिलेच पाहजे असे नाही. मराठा समाजाच्या ३-४ पिढ्या यात गेल्याचे त्यांनी सांगितले.-----------------------------------------------------------------------------------------

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद