शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गावची स्वच्छता करणाऱ्यांना बाळापुरात ध्वज फडकवण्याचा मान; महिला सरपंचांचा कौतुकास्पद निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 16:16 IST

गावातील कचरा आणि नाले उपसणाऱ्या एका कष्टकरी हातांना यंदा चक्क राष्ट्रध्वज फडकवण्याचा सर्वोच्च मान देण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर: प्रजासत्ताक दिन हा संविधानाचा उत्सव असतो, पण छत्रपती संभाजीनगरमधील बाळापूर (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) गावाने यंदा या उत्सवाचा असा एक चेहरा पाहिला, जो माणुसकीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. गावातील कचरा आणि नाले उपसणाऱ्या एका कष्टकरी हातांना यंदा चक्क राष्ट्रध्वज फडकवण्याचा सर्वोच्च मान देण्यात आला. सरपंच नीता सुनील गिऱ्हे यांच्या या एका निर्णयाने ग्रामपंचायत कर्मचारी शाहू महाराज आदमाने यांचे आयुष्य सार्थकी लागले.

२० वर्षांच्या कष्टाचा 'पांढरा शुभ्र' सन्मान गेल्या दोन दशकांपासून शाहू महाराज आदमाने हे ऊन-पावसाची पर्वा न करता गाव स्वच्छ ठेवण्याचे काम करत आहेत. ज्या हातांशी हस्तांदोलन करतानाही अनेकदा समाज संकोच करतो, त्याच हातांना तिरंगा फडकवण्याचा मान मिळणार, असा निरोप जेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचला, तेव्हा त्यांचा स्वतःवर विश्वासच बसेना. आयुष्यभर मळक्या कपड्यात राबलेल्या या 'स्वच्छता दूताने' आयुष्यातला पहिला कोरा करकरीत पांढरा शुभ्र पोशाख खरेदी केला. तो केवळ वेष नव्हता, तर त्यांच्या इमानदारीला मिळालेली पोचपावती होती.

कष्टकऱ्यांना दिला सलामीचा मानसोमवारी सकाळी जेव्हा शाहू महाराजांच्या हातात तिरंग्याची दोरी देण्यात आली, तेव्हा त्यांचे हात स्पष्टपणे थरथरत होते. ती थरथर भीतीची नव्हती, तर २० वर्षांच्या उपेक्षेचा अंत होऊन मिळालेल्या कृतज्ञतेची होती. त्यांनी जेव्हा दोरी ओढली आणि तिरंगा आकाशात झेपावला, तेव्हा केवळ फुलांचाच नाही तर गावकऱ्यांच्या आनंदाश्रूंचाही वर्षाव झाला. मेहनतीचा गौरव केवळ शाहू महाराजच नव्हे, तर गावातील अतिशय मेहनती नागरिक आणि भाजीपाला व्यवसाय करणारे आसाराम सांगळे यांनाही जिल्हा परिषद शाळेसमोरील ध्वजारोहणाचा मान देण्यात आला. सामान्य माणसाला लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा हा प्रयत्न सर्वांच्याच मनाला भावला.

यावेळी बाळापूरच्या सरपंच नीता गिऱ्हे, उपसरपंच अर्जुन जौक, ग्रामसेवक सचिन पाटील, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीबाई पवार, सुनीताबाई अवताडे, वंदनाबाई वाघ, आकाश बांगर, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष पवार, सामाजिक कार्यकर्ते सुरेश अवताडे, गणेश वाघ, शरद पवार, जनार्दन वाघ, सुनील वाघ,  आसाराम सांगळे, शाळेचे मुख्याध्यापक विवेक पिटेकर, शिक्षिका प्रतिभा सुरासे,  अंगणवाडी शिक्षिका मीरा जौक, रुखमन जौक, अर्चना जौक, सोनाबाई गिऱ्हे यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती.

आयुष्यातलं सर्वात मोठं पुण्यकर्म"हा केवळ ध्वजारोहण सोहळा नव्हता, तर तो त्या घामाचा आणि निष्ठेचा सन्मान होता ज्याने माझ्या गावाला आरोग्य दिलं. शाहू महाराजांच्या हातांनी तिरंगा फडकताना पाहणं, हे माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं पुण्य आणि आत्मिक समाधान आहे."- नीता सुनील गिऱ्हे (सरपंच, बाळापूर)

English
हिंदी सारांश
Web Title : Balapur Honors Sanitation Workers with Flag Raising; Laudable Sarpanch Decision!

Web Summary : Balapur honored sanitation worker Shahu Maharaj Admane with flag raising rights. His decades of service and dedication were recognized. Another hard worker was also honored, integrating common men into democracy.
टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिन २०२६chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर