शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
5
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
6
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
7
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
8
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
9
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
10
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
11
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
12
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
13
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
14
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
15
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
16
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
17
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
18
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
19
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
20
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता

'सावकाराचा जाच,अवकाळीमुळे हतबलता'; मराठवाड्यात रोज दोन शेतकरी संपवतात जीवन

By विकास राऊत | Updated: April 5, 2023 20:13 IST

जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या ९० दिवसांत २१४ शेतकऱ्यांनी उचलले टोकाचे पाऊल.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ४० टक्के शेतकऱ्यांना गेल्या हंगामात बँकांनी कर्ज दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना महागड्या व्याजाने सावकारी कर्ज घ्यावे लागले. खताला जीएसटी लावून सबसिडी कपात केली. कापसाला भाव मिळत नाही तर हरभरा खरेदी करण्याबाबत निर्णय नाही. सोयाबीनने फटका दिला. यामुळे शेतकरी प्रचंड नैराश्यात असून, गेल्या ९० दिवसांत विभागात २१४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. रोज दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या विभागात होत असल्याचे प्रमाण आहे.

जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या ९० दिवसांत २१४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ६५ आत्महत्या झाल्या. सावकारी कर्ज, इतर बँकांचे कर्ज, नापिकी, अतिवृष्टीमुळे हातून गेलेले पीक, सरकारकडून मिळत नसलेली मदत ही कारणे शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढविण्यासाठी पोषक ठरत असल्याचे बोलले जाते. विभागात बँकांकडून मिळणारे पीककर्ज सरसकट मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त व्याज घेणाऱ्या सावकारांकडे हात पसरावे लागतात.

चार वर्षांपासून अतिवृष्टीमराठवाड्यात चार वर्षांपासून अतिवृष्टी होत असून, यामध्ये खरीप हंगामातील पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. ४० लाख हेक्टरपेक्षा अधिक नुकसान दरवर्षी झाले आहे. शेतकरी आत्महत्या वाढीमागे हेदेखील कारण आहे. भरपाईसाठी चार वर्षांत १२ हजार कोटींच्या आसपास मदतनिधी शासनाने दिला.

बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्याबीड जिल्ह्यात गेल्या ९० दिवसांत ६५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. त्याखालोखाल धाराशिव जिल्ह्यात ४३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

आता प्रशासन करणार सर्व्हे.....मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक, मानसिक, कौटुंबिक स्थितीची आगामी काळात उकल व्हावी, यासाठी ग्रामविकास, कृषी आणि महसूल प्रशासन सर्वेक्षण करणार आहे. विभागात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबता थांबेना. सावकारी कर्ज, नापिकी, अतिवृष्टी, मानसिक ताणासह इतर अनेक नैराश्यांचा सामना शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यांची सद्य:स्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी सहा पानी प्रश्नावलींतून सर्व्हे करण्यात येणार आहे. सर्व्हेच्या विश्लेषणाअंती उपाययोजनांवर प्रशासन तज्ज्ञांशी चर्चा करून पुढे जाणार आहे. या सर्व्हेच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्ह्यातील दीड हजारांवर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

नवीन वर्षांतील ९० दिवसांत २१४ आत्महत्याछत्रपती संभाजीनगर : २३जालना : १५परभणी : १८हिंगोली : ०५नांदेड : ३१बीड : ६५लातूर : १४धाराशिव : ४३एकूण : २१४ 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याMarathwadaमराठवाडाagricultureशेतीFarmerशेतकरी