चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार हायटेंशन टॉवरवर धडकली; गटविकास अधिकारी थोडक्यात बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2022 19:24 IST2022-03-14T19:23:41+5:302022-03-14T19:24:00+5:30
ट्रेकींग झाल्यानंतर परत कारने खुलताबादकडेे येत असतांना झाला अपघात

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार हायटेंशन टॉवरवर धडकली; गटविकास अधिकारी थोडक्यात बचावले
खुलताबाद: म्हैसमाळ रोडवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या खाली उतरून थेट एक्सप्रेस हायटेंशन लाईटच्या टॉवरजवळ आदळयाची घटना सोमवारी सकाळी ८:३० वाजता घडली. अपघातात ट्रेकींग करून परत येत असलेले गटविकास अधिकारी प्रविण सुरडकर हे थोडक्यात बचावले आहेत.
खुलताबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रविण सुरडकर हे आज सकाळी ७:३० वाजता आपल्या खाजगी कारने ( क्रमांक एमएच २१ बीएफ ४६७४ ) म्हैसमाळ येथील डोंगरात ट्रेकींगसाठी गेले होते. ट्रेकींग झाल्यानंतर परत कारने खुलताबादकडेे येत असतांना सकाळी ८:३० वाजता वळणावर ( लालमाती परिसरात) चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगातील कार तारेचे कुंपन तोडून थेट एक्सप्रेस लाईनच्या टॉवरजवळ जावून धडकली. गटविकास अधिकारी प्रविण सुरडकर यांना या अपघातात साधे खरचटले सुध्दा नाही. मात्र, कारचे मोठे नुकसान झाले आहे.