शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
6
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
7
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
8
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
9
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
10
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
11
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
12
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
13
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
14
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
15
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
16
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
17
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
18
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
19
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
20
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास महानाट्यातून; रंगमंचावर १५० कलावंत, २० फुटी जहाज अन् लढाया

By संतोष हिरेमठ | Updated: December 22, 2022 14:31 IST

छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास घरोघरी पोहोचावा : खा. अमोल कोल्हे

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास घरोघरी पोहोचावा, तो प्रत्येक काळजावर कोरला जावा, या हेतूने औरंगाबादेत ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. अडीच तासांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मापासून तर बलिदानापर्यंतचा धगधगता इतिहास मांडला येईल. भव्य रंगमंच, दिग्गज आणि स्थानिक असे १५० कलावंत, बैलगाड्या, तडाखेबाज संवाद, तोफा, लढाया, आतषबाजी, प्रेक्षकांमधून घोड्यावरून प्रवेश, रंगमंचावर येणारे २० फुटी जहाज या सगळ्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनावर इतिहास कोरणारे हे महानाट्य आहे, असे अभिनेते खा. अमोल कोल्हे म्हणाले.

औरंगाबादेत २३ ते २८ डिसेंबरदरम्यान जबिंदा मैदानावर या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त डाॅ. अमोल कोल्हे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. डाॅ. कोल्हे म्हणाले, आजकाल शालेय अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास दिवसेंदिवस कमी होत आहे. आत्मसन्मान शाबूत ठेवण्याच्या दृष्टीने आपला इतिहास, संस्कृती माहिती असणे आवश्यक असते.

काय आहे महानाट्य?कोल्हे म्हणाले, औरंगाबादेत २०१२ मध्ये हे महानाट्य झाले होते. महानाट्यात केवळ मनोरंजन हा भाग नाही. हा एक संस्कार आहे. आपल्या मातीचा, आपल्या राज्याचा, आपल्या राष्ट्राचा अभिमान हा मनात जागृत होणे गरजेचे आहे. आजकाल पुस्तके वाचण्याचे प्रमाण कमालीचे कमी झाले आहे. दृकश्राव्य माध्यमे म्हणजे मालिका, चित्रपट किंवा अशा महानाट्यातून इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार आहे.

महानाट्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोडमहानाट्याच्या सादरीकरणात एलईडी स्क्रीन, इलेक्ट्रिकल आतषबाजी, अत्याधुनिक लाईट्स आहे. जंजिरा मोहिमेच्या प्रसंगात २० फुटांचे जहाज रंगभूमीवर येते. त्या वेळी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समुद्राचा अनोखा इफेक्ट पाहायला मिळेल.

४ मजली सेट, १२ हजार प्रेक्षकांची आसन व्यवस्थाकोल्हे म्हणाले, जबिंदा मैदानावर जवळपास ४ मजली सेट आहे. १० ते १२ हजार प्रेक्षक बसतील, अशी व्यवस्था आहे. महानाट्य म्हटले की, आज एक भाग, उद्या दुसरा भाग, असा अनेकांचा गैरसमज असतो. मात्र तसे नसून दररोज पूर्ण प्रयोग होणार आहे. किमान ६० हजार नागरिक हे महानाट्य पाहतील. पहिल्या दिवशी सावली अनाथाश्रमातील ७२ बालके स्पेशल गेस्ट म्हणून उपस्थित राहतील. अनेक स्थानिक कलावंत २०१२ पासून या महानाट्याचा भाग आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद