शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

टीईटीनंतरचा मोठा घोटाळा; बनावट वेबसाईटद्वारे ७०० जणांना दिले दहावी पासचे प्रमाणपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 14:06 IST

छत्रपती संभाजीनगरच्या टोळीचा कारनामा; प्रत्येकी ३५-५० हजार रुपये उकळले

पुणे / छत्रपती संभाजीनगर : बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र बनविणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या टोळीने चक्क महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूलसारखी बनावट वेबसाइट बनवून त्याद्वारे तब्बल ७०० जणांना बनावट प्रमाणपत्रे दिल्याचे तपासात उघड झाले आहे.

दहावी नापास असलेल्यांना बनावट प्रमाणपत्र देत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करून संदीप ज्ञानदेव कांबळे (रा. सांगली) याच्याशी संपर्क केला. कांबळे याने दहावी पासच्या प्रमाणपत्राला ६० हजार रुपये लागतील असे सांगितले. बनावट ग्राहकाने ३९ हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर उरलेले १६ हजार रुपये घेण्यासाठी संदीप कांबळे हा स्वारगेटला आला असता त्याला सापळा रचून पकडण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत कृष्णा सोनाजी गिरी (रा. बिडकीन, संभाजीनगर), अल्ताफ शेख (रा. परांडा, जि. धाराशिव), सय्यद इम्रान सय्यद इब्राहीम (रा. संभाजीनगर) यांची नावे निष्पन्न झाली. पोलिसांनी या तिघांना अटक केली. गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पाेकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर तपास करीत आहेत.

२०१९ पासून सुरू केली वेबसाइटछत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल सुरू करण्यात आली आहे. या टोळीने त्यांच्यासारखीच दिसेल, अशी वेबसाइट २०१९ पासून सुरू केली. या टोळीने दहावी पास असलेल्याचे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या तपासात ३५ जणांना त्यांनी १०वी पासचे प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले होते. या वेबसाइट व त्यांच्या कारनाम्याची तपासणी केल्यानंतर त्यांनी आतापर्यंत ७०० जणांना अशाप्रकारे बनावट १०वी, १२वी पासचे प्रमाणपत्र दिल्याचे आढळून आले आहे.

प्रत्येकी ३५-५० हजार रुपये उकळलेप्रमाणपत्र देण्यासाठी या टोळीने अनेक ठिकाणी एजंट नेमले होते. संदीप कांबळे याच्यासारखे एजंट ज्यांना १०वी पासचे प्रमाणपत्र गरजेचे आहे, अशांसोबत संपर्क साधत. त्यांच्याकडून पैसे घेऊन प्रमाणपत्र दिले जात होते. त्यासाठी ३५ हजार ते ५० हजार रुपये घेतले जात होते. नोकरी, व्यवसाय, कर्ज तसेच अन्य कामांसाठी दहावी पास ही अट ठेवली असल्याने अनेकजण इतके पैसे देऊन हे प्रमाणपत्र घेत असल्याचे पोलिस तपासात आढळून आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण