तोच गुत्तेदार अन् तेच काम ५ लाख ‘खड्ड्या’त
By Admin | Updated: February 12, 2015 00:57 IST2015-02-12T00:43:04+5:302015-02-12T00:57:25+5:30
सोमनाथ खताळ , बीड बसस्थानकातील छोट्या मोठ्या कामांच्या दुरुस्तीसाठी तब्बल सव्वापाच लाख रुपये खर्च केले. प्रत्यक्षात काम मात्र थातुरमातूर पद्धतीने केले. गुत्तेदारांना हाताशी धरून येथील अधिकाऱ्यांनी

तोच गुत्तेदार अन् तेच काम ५ लाख ‘खड्ड्या’त
सोमनाथ खताळ , बीड
बसस्थानकातील छोट्या मोठ्या कामांच्या दुरुस्तीसाठी तब्बल सव्वापाच लाख रुपये खर्च केले. प्रत्यक्षात काम मात्र थातुरमातूर पद्धतीने केले. गुत्तेदारांना हाताशी धरून येथील अधिकाऱ्यांनी सव्वापाच लाख रुपये काम न करताच खर्च केल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारातून मंगळवारी पुढे आली आहे.
‘प्रवासी हेच आमचे दैवत’, ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यासारखे ब्रीद घेऊन राज्य परिवहन महामंडळ काम करते. प्रत्यक्षात मात्र खरचं प्रवाशांना दैवत मानले जाते का, त्यांना सोयी सुविधा दिल्या जातात का, याचे निरीक्षण केले असता प्रवाशांना असुविधा तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हेटाळणीचा सामना करावा लागतो. कारण बीड बसस्थानकात सव्वापाच लाख रूपये खर्चूनही कोणत्याही सोयी-सुविधा न देता, कामे न करता पैसे खर्च करण्याचे काम येथील स्थापत्य विभागातील अधिकाऱ्यांनी केले आहे.
बसस्थानकात पडलेले खड्डे, पार्किंगची दुरूस्ती, फलाटावरील बोर्डाची रंगरंगोटी आदी कामांसाठी स्थापत्य विभागातील अधिकाऱ्यांनी ५ लाख २५ हजार ४० रुपये खर्च केले. मात्र ज्या कामासाठी पैसे खर्च केले ती कामे निकृष्ट झाल्याचा आरोप जनाधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनुप मंत्री यांनी केला आहे. विशेष म्हणजे अशी काही कामे आहेत की ते न करताच बिल काढण्याचा महाप्रताप स्थापत्य विभागातील अभियंत्यांनी दाखवला आहे.
स्थानकातील खड्डे बुजविण्यासाठी अनेक संघटना आक्रमक झाल्या, आंदोलने केली. यावर महामंडळाने हे खड्डे बुजविले मात्र अवघ्या काही तासातच हे खड्डे उखडले. त्यामुळे हे काम निकृष्ट करून केवळ बिले उचलण्याचे कामही हे अधिकारी करीत असल्याचा आरोप मंत्री यांनी केला आहे.
त्याला आमचा नाईलाज...
जे खड्डे लवकर उखडतात, आम्ही केलेले काम लवकर खराब होत असेल तर ते केवळ वाहनांच्या वर्दळीमुळेच. त्याला आम्ही तरी काय करणार ? आमचा त्याला नाईलाज आहे, असे सांगण्यासही मारूळकर यांनी कमी केले नाही.
‘आरएम’ म्हणाले, चौकशी करू
प्रादेशिक व्यवस्थापक ए.आर. मुंडीवाले म्हणाले, ही सर्व कामे विभागीय नियंत्रकांच्या अखत्यारीत येतात. जर कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
स्थानकातील खड्डे बुजविण्याच्या कामासह इतर कामे नेहमी एकाच गुत्तेदाराला दिले जातात.
४संबंधीत गुत्तेदारही काम निकृष्ट करून जास्त बिल काढतात.
४जास्तीच्या बिलाची टक्केवारी करून अधिकारी व गुत्तेदार पैसे वाटून घेत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी सांगितली.
म्हणे, वर्दळ खूप असते...
४स्थानकातील खड्डे बुजविण्यासाठी लाखो रूपये खर्च केले जातात.
४हे खड्डे अवघ्या बारा तासात उखडल्याचे अनुभव आहेत.
४हे खड्डे का उखडतात, असे शाखा अभियंता ए.डी.मारूळकर यांना विचारले असता येथे गाड्यांची वर्दळ नेहमीच असते, असे सांगून त्यांनी हात झटकले.