ठाण्याच्या पोलिस पथकाने हलगऱ्यातून एकास उचलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2016 14:05 IST2016-07-05T12:44:31+5:302016-07-05T14:05:09+5:30

निलंगा तालुक्यातील हलगरा येथील ग्राम पंचायतच्या सेवानिवृत्त सेवकास सोमवारी सकाळी ठाण्याच्या पोलिस पथकाने उचलल्याने खळबळ उडाली आहे

The Thane Police has picked one of the gangsters | ठाण्याच्या पोलिस पथकाने हलगऱ्यातून एकास उचलले

ठाण्याच्या पोलिस पथकाने हलगऱ्यातून एकास उचलले

>ऑनलाइन लोकमत
लातूर / औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील हलगरा येथील ग्राम पंचायतच्या सेवानिवृत्त सेवकास सोमवारी सकाळी ठाण्याच्या पोलिस पथकाने उचलल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी औराद शहाजानी पोलिस ठाण्यात दिवसभर त्याची चौकशी  करत त्यास सायंकाळच्या सुमारास मुंबईकडे घेवून पथक रवाना झाले. या प्रकरणात सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांचीही चौकशी झाल्याचे वृत्त आहे.
निलंगा तालुक्यातील हलगरा येथील एका संशयित व्यक्तीच्या जन्म दाखल्याच्या चौकशी प्रकरणी मुंबई येथील चारकोपचे एटीएस पथक मार्चच्या शेवटच्या आठवड्यात शाळेच्या दप्तर तपासणीसाठी आले होते. दरम्यान, यावेळी एटीएसच्या पथकाने हलगरा आणि शिरसी हंगरगा येथील जिल्हा परिषद शाळेतील रेकॉर्डची तपासणी केली होती. यावेळी महमंद लोकमन मुदोलोक शेख या नावाचा जन्म दाखला  २५ आॅक्टोबर १९७९ साली देण्यात आल्याचे पुढे आले आहे. या संशयित व्यक्तिच्या कागदपत्रांची चौकशी आणि पाहणी करण्यासाठी मुंबईचे एटीएस पथक आले होते. तेव्हापासूनच हलगरा हे गाव एटीएसच्या रडारवर असल्याचे पुढे आल्यानंतर खळबळ उडाली होती. दरम्यान, सोमवारी ग्रामपंचायतीचे सेवानिवृत्त सेवक बशीर जैन्नूसाब मुल्ला (६०) याला ठाणे जिल्ह्यातील श्रीनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने सकाळी ताब्यात घेतले आहे. त्याची औराद शहाजानी पोलिस ठाण्यात दिवसभर चौकशी करण्यात आली असून, हे पथक सायंकाळच्या सुमारास मुंबईकडे बशीरला घेवून रवाना झाले. दरम्यान, हलगरा येथील संशयित असणाºया व्यक्तीची चौकशी एटीएस आणि ठाणे पोलिस करणार असल्याचे समजते़.
 
सकाळी धडकले पथक...
बशीर मुल्ला याचे घर विचारत गावात दाखल झालेल्या ठाण्याच्या पोलिस पथकाने त्याचे घर गाठले. यावेळी त्यांनी बशीरला ताब्यात घेतले. याबाबत कुटुंबियांना कुठलीच माहिती नसल्याने, कुटुंबिय गोंधळून गेले होते़ बशीरला पोलिसांनी पकडून नेल्याने कुटुंबियासह हलगरा आणि निलंगा तालुकावासीयांचे धाबे दणाणले आहेत. 
 
बशीरने काय केले?
एटीएसच्या रडारवर असलेल्या महमंद लोकमन मुदोलोक शेख हा बॉम्बस्फोट आरोपातील संशयीत आरोपी आहे. याने बनविलेल्या पासपोर्टला हलगरा येथील ग्राम पंचायत कार्यालयातून बनावट कागदपत्रे पुरविण्यात आली आहेत. जन्म दाखला, रहिवासी दाखला बशीर मुल्ला याने पुरविल्याचा आरोप आहे. त्याच्यावर ४२० चा गुन्हाही दाखल झाल्याचे समजते. परंतु,  याप्रकरणाला दुजोरा मिळाला नाही़ उदगीर येथून बॉम्बस्फोट प्रकरणात हिमायत बेगनंतर बशीरला उचलण्याची जिल्ह्यातून ही दुसरी कारवाई आहे़ बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी म्हणून हिमायतला उचलण्यात आल्यानंतर लातूरकडे एटीएसचे विशेष लक्ष होते. हलग-यात याचे धागेदोरे सापडले. महमंद लोकमन मुदोलोक शेख  याचा मदतनीस म्हणून बशीर मुल्लाला उचण्यात आले आहे.

Web Title: The Thane Police has picked one of the gangsters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.