हिंगोलीत ५५ हजारांचा बनावट माल जप्त

By Admin | Updated: June 15, 2017 23:20 IST2017-06-15T23:17:09+5:302017-06-15T23:20:15+5:30

हिंगोली : मूळ कंपनीचे बनावट उत्पादन विक्री करणाऱ्यास स्थागुशाच्या पोलिसांनी १५ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले.

Textured goods worth Rs 55,000 were seized in Hingoli | हिंगोलीत ५५ हजारांचा बनावट माल जप्त

हिंगोलीत ५५ हजारांचा बनावट माल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मूळ कंपनीचे बनावट उत्पादन विक्री करणाऱ्यास स्थागुशाच्या पोलिसांनी १५ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले. त्याच्याकडील ५५ हजार २७५ रूपये किंमतीचा बनावट उत्पादन जप्त करण्यात आले.
हिंगोलीलगतच्या सुराणानगर परिसरात मोहम्मद सलमान अब्दुल अहेमद रा. पाकिजा नगर, देगलूर जि. नांदेड हा मूळ कंपनीचे उत्पादन बनावट करून विक्री करताना आढळून आला. याप्रकरणी हिरालाल कन्हैयालाल ठठोरा (रा. मुंबई) यांच्या फिर्यादीवरून मोहम्मदविरूद्ध कॉपी राईट अ‍ॅक्टनुसार हिंगोली ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
महिलेची फसवणूक
वसमत येथील चौफुलीवर महिलेची एका इसमाने पिशवीतील नगदी रोकड व चांदीचे दागिने लंपास करून फसवणूक केली. परभणी येथील लक्ष्मीबाई सखाराम कदम असे महिलेचे नाव आहे. नजरचलाखीने बोलण्यात भूलवून लक्ष्मीबाई यांच्या पिशवीतील रोकड व चांदीचे दागिने असा एकूण १३ हजार ४०० रूपयांचा ऐवज लंपास केला. वसमत शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Textured goods worth Rs 55,000 were seized in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.