शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पाणीपुरवठा योजनेतील सहा जलकुंभांची चाचणी पूर्ण; आता फक्त हस्तांतरणाची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 20:09 IST

दाेन मोठ्या जलकुंभांचा वापर सुरू : एका जलकुंभाची चाचणी बाकी

छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहरात ५३ जलकुंभ उभारणीचे काम सुरू आहे. त्यातील दोन जलकुंभ मनपाला हस्तांतरित केले. त्यांचा वापरही सुरू आहे. सहा जलकुंभांची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. त्याचे हस्तांतरण बाकी आहे. एका जलकुंभाची चाचणी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत देण्यात आली. सहा जलकुंभाचा वापर सुरू झाल्यावर नागरिकांना अधिक दाबाने पाणीपुरवठा होईल.

नवीन पाणीपुरवठा योजनेत शहरात नवीन १९०० किलोमीटर जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत एक हजार किमी जलवाहिन्या टाकण्यात आल्या. याशिवाय नक्षत्रवाडी येथील डोंगरावरून शहरात सहा वेगवेगळ्या जलवाहिन्या शहरात आणण्यात येत आहेत. मार्चपर्यंत शहरात पाणी आलेच पाहिजे, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जीव्हीपीआर कंपनीची यंत्रणा कामाला लागली आहे. पूर्वीच्या तुलनेत कामाला गतीही प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. महापालिका आणि नगरपरिषदेच्या काळातील ३६ जलकुंभ आहेत. हे अपुरे पडत असल्याने नवीन ५३ जलकुंभ उभारण्यात येत आहेत. त्यातील पहाडसिंगपुरा आणि शिवाजी ग्राऊंड येथील जलकुंभ वापरण्यात येत आहेत. सहा नवीन जलकुंभांची चाचणी पूर्ण झाली. एकाची चाचणी सुरू आहे. सहा जलकुंभांचा वापर कधीही सुरू करता येईल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे.

वारंवार आश्वासनेजलकुंभ हस्तांतरित करण्यासाठी अनेकदा तारीख घोषित करण्यात आली. मात्र, नियोजित वेळेत जलकुंभ हस्तांतरित झाले नाहीत. छोटे-मोठे लिकेज, आऊटलेटमध्ये समस्या आदी तांत्रिक अडचणींमुळे विलंब झाला. चाचणी झालेल्या जलकुंभातून मनपा कधीही पाणीपुरवठा सुरू करू शकते, असे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी सांगितले.कोणते जलकुंभ तयार ?- हिमायतबाग, प्रतापनगर, दिल्लीगेट, शाक्यनगर, नक्षत्रवाडी, मिसारवाडी गरवारेजवळ.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMuncipal Corporationनगर पालिकाWaterपाणी