शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी फटक्याने औरंगाबाद जिल्ह्यात दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:41 IST

जामगावात केळीची बाग उद्ध्वस्त : दौलताबाद परिसरात १ तास जोरदार पाऊस; धामणगाव येथे वीज पडून गाय ठार

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी ४ ते ६ वाजेदरम्यान वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे दाणादाण उडाली. गंगापूर तालुक्यातील जामगाव परिसरात शेतक-याच्या केळीच्या बागा उद्ध्वस्त झाला, तर फुलंब्री तालुक्यातील धामणगाव येथे वीज पडून गायीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दौलताबाद परिसरात एक तास जोरदार पाऊस झाल्याने वीट उद्योगाला मोठा फटका बसला, तर जिल्ह्यात इतर ठिकाणीही वादळी पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली.गंगापुरात केळी, कांदा पिकाचे नुकसानगंगापूर : सोमवारी ५ वाजेच्या सुमारास सायंकाळी गंगापूर तालुक्यात काही ठिकाणी झालेल्या वादळी पावसामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, तर कांदा पीक, वीट उद्योगालाही याचा फटका बसला.तालुक्यातील जामगाव मार्गावरील गंगापूर शिवारात मारुती धनायत यांच्या शेतातील केळीची बाग वादळी वाºयामुळे उद्ध्वस्त झाली. यामुळे धनायत यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी सदर शेतकºयाने केली आहे.गंगापूर शहरात पावसामुळे १० मिनिटांत सर्वत्र पाणीचपाणी साचले होते, तर ग्रामीण भागात वादळी वाºयाने ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. अचानक आलेल्या पावसाने वीट उत्पादक व कांदा उत्पादक शेतकºयांची धावपळ झाली. दरम्यान, वादळी वारा व विजेचा कडकडात यामुळे गंगापूर शहरातील वीज गुल झाली होती. रात्री उशिरापर्यंत गंगापूर अंधारातच होते.दौलताबाद परिसरात एक तास हजेरीदौलताबाद : परिसरात सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जवळपास एक तास पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतकºयांच्या पिकांसह वीट उद्योगाला मोठा फटका बसला.दौलताबादसह माळीवाडा, फतियाबाद, रामपुरी, केसापुरी, केसापुरी तांडा, शरणापूर, वंजारवाडी येथे दुपारच्या वेळेस अडीच वाजेच्या सुमारास चोहोबाजूंनी काळे ढग जमा झाले. ३ वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे वीटभट्ट्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच शेतकºयांच्या पिकांचेही नुकसान झाले.गायीचा मृत्यू; शेतकºयाचे नुकसानजातेगाव : फुलंब्री तालुक्यातील धामणगाव येथे सोमवारी ५ वाजेच्या सुमारास वादळी वाºयासह पाऊस झाला. यावेळी वीज पडून एका गायीचा मृत्यू झाला.सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास धामणगाव परिसरात वादळी वाºयासह पाऊस झाला. यावेळी वीज पडून शेतकरी एकनाथ गंगाधर डिडोरे यांच्या गट नं. १९१ शेतातील गायीचा जागेवरच मृत्यू झाला. यामुळे शेतकºयाचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, धामणगावसह वाघोळा, नांद्रा, जातेगाव, बाभूळगाव, पिंपळगाव येथेही पावसाच्या सरी कोसळल्या.पीरबावडा परिसरात हजेरीपीरबावडा : परिसरात सोमवारी दुपारी ३.३० वाजता पावसाने हजेरी लावली.परिसरात जवळपास अर्धा तास पाऊस सुरू होता. यामुळे शेतकºयांसह नागरिकांची एकच धांदल उडाली. पावसामुळे टँकरवर पाणी भरण्यासाठी आलेल्या महिलांची पंचाईत झाली.तुर्काबाद-खराडी परिसराला फटकालिंबेजळगाव : तुर्काबाद-खराडी व अंबेलोहळ परिसरात सोमवारी सायंकाळी ५ वाजता जोरदार वाºयासह पाऊस पडला. तुर्काबाद-खराडीसह अंबेलोहळ परिसरातील टोकी येथे सोमवारी झालेल्या पावसामुळे कांद्यासह इतर पिकांचे नुकसान झाले. तसेच परिसरातील वीटभट्टी उद्योगाला या पावसाचा फटका बसला. दरम्यान, कडक उन्हामुळे उकाडा सहन करणाºया नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला.लाडसावंगीत सरी कोसळल्यालाडसावंगी : येथे सोमवारी दुपारी २ वाजता पावसाने काही वेळ हजेरी लावली. कडक उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला. भर उन्हाळ्यात पाऊस पडत असल्याने शेतकºयांची पिके, चारा वाचविण्यासाठी एकच धावपळ उडाली.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी