शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
6
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
7
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
8
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
9
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
10
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
11
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
12
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
13
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
14
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
15
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
16
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

जालना रोडवर बस-पिकअपचा भीषण अपघात; ५ जण जागीच ठार, तिघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 22:42 IST

कळमनुरी-पुणे बस आणि एका जीपमध्ये गाढेजवळगाव फाट्यावर झाला अपघात

- श्रीकांत पोफळे

औरंगाबाद:औरंगाबाद- जालनारोडवरील गाढे जवळगाव फाट्यावर बस- आणि पिकअपच्या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार झाले. तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, भरधाव वेगाने एक पिकअप जीप ( एमएच २१ बीएच ४३३१) जालन्याकडून औरंगाबादच्या दिशेने येत होती. गाढे जालना रोडवरील जवळगाव फाट्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप अचानक दुभाजकावर चढून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस गेली. याच दरम्यान जालन्याकडे जाणारी पुणे-कळमनुरी बस समोर आली. बस चालकाने प्रसंगावधान राखत डाव्या बाजूला बस घेतली. मात्र, पिकअप बसवर आदळली. यात चार जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर तिघे जण गंभीर जखमी आहेत. मृतांची संख्या आणखी वाढू शकते असा प्रत्यक्षदर्शींचा अंदाज आहे. अपघात एवढा भीषण होता की पिकअपचा समोरील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे.

माहिती मिळताच करमाड पोलिसांनी लागलीच अपघातस्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. जखमींना उपचारासाठी औरंगाबादकडे रवाना करण्यात आल्याची माहिती आहे. अपघातामुळे जालना रोडवरील दोन्ही  बाजूची वाहतूक प्रभावित झाली होती. पोलीसांनी प्रयत्नपूर्वक वाहतूक सुरळीत केली. 

मृतांची नावे अशी आहेत :1. लहू ज्योतीराम राठोड (वय 50 वर्ष राहणार रेणुका नगर औरंगाबाद)2. अशोक जयसिंग चव्हाण (राहणार सातारा तांडा)3. चव्हाण रणजित जयसिंग चव्हाण (राहणार सातारा तांडा)4. शांतीलाल हरी चव्हाण (राहणार सातारा तांडा)5. लता उर्फ पारूबाई ज्ञानेश्वर जाधव (राहणार राज नगर बीड बायपास, औरंगाबाद)

जखमींची नावे :6. विकास ढेरे7. रोहित विकास ढेरेदोघे राहणार गुरु लॉन्सच्या पाठीमागे बीड बायपास, औरंगाबाद

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद