वसंतराव नाईक चौकात बेवारस अवस्थेतील जीपने वाढवले टेंशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 19:01 IST2021-04-17T19:01:03+5:302021-04-17T19:01:24+5:30
जालना रोडवरील वसंतराव नाईक चौकात उड्डाणपुलाखाली एक जीप (एम. एच. 16 ए. टी. 6024) बेवारसपणे उभी होती.

वसंतराव नाईक चौकात बेवारस अवस्थेतील जीपने वाढवले टेंशन
औरंगाबाद : सिडको बसस्थानकाजवळ असलेल्या वसंतराव नाईक चौकात दोन दिवसांपासून एक जीप बेवारस अवस्थेत उभी असल्याची माहिती काही नागरिकांनी सकाळी पोलिसांना दिली. याची माहिती मिळताच बॉम्ब शोधक पथकाने तत्काळ धाव घेऊन जीपची संपूर्ण तपासणी केली. तपासणीत जीपमध्ये आक्षेपार्ह काही आढळून आले नाही यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
जालना रोडवरील वसंतराव नाईक चौकात उड्डाणपुलाखाली एक जीप (एम. एच. 16 ए. टी. 6024) बेवारसपणे उभी होती. दरम्यान, मागील दोन दिवसांपासून बेवारसरित्या ही जीप येथेच उभी असल्याची माहिती काही नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ बॉम्बशोधक पथक आणि डॉग स्कॉडसह घटनास्थळी धाव घेतली. बॉम्बशोधक पथकाने जीपच्या काचा फोडून पूर्ण तपासणी केली. तपासणीत जीपमध्ये आक्षेपार्ह काहीच आढळून आले नाही, अशी माहिती बॉम्बशोधक पथकाचे राजू घाटे यांनी दिली आहे.