दहा उमेदवारांचे तेरा अर्ज दाखल

By Admin | Updated: December 24, 2014 01:01 IST2014-12-24T00:56:52+5:302014-12-24T01:01:04+5:30

तुळजापूर : नगर परिषद हद्दवाढ प्रभाग क्रमांक पाच मधील एका सर्वसाधारण जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी मंगळवारी १० उमेदवारांचे १३ अर्ज दाखल झाल्याची

Ten candidates filed your application | दहा उमेदवारांचे तेरा अर्ज दाखल

दहा उमेदवारांचे तेरा अर्ज दाखल


तुळजापूर : नगर परिषद हद्दवाढ प्रभाग क्रमांक पाच मधील एका सर्वसाधारण जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी मंगळवारी १० उमेदवारांचे १३ अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी काशीनाथ पाटील यांनी दिली.
अर्ज दाखल केलेल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे अमर हरिश्चंद्र हंगरगेकर व भारती नारायण गवळी यांचे प्रत्येकी दोन तर अपक्ष शिवाजी अंबादास डावकरे यांनी दोन अर्ज दाखल केले. विशाल बाळासाहेब कोंडो, अमोल माधव कुतवळ, अमर अशोक मगर, हरिश हणमंत रोचकरी, भारत बाबूराव कदम, अनिल महादेव राठोड, धैैर्यशील रावसाहेब पाटील यांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला. यात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने शक्ती प्रदर्शन करीत अमर हंगरगेकर यांचा अर्ज दाखल केला. यावेळी नगराध्यक्षा जयश्री कंदले, उपाध्यक्ष गणेश कदम, गटनेते नारायणराजे गवळी,माजी उपाध्यक्ष दिलीप गंगणे, विजय कंदले, आनंद कंदले आदी उपस्थित होते. दरम्यान, या निवडणुकीसाठी सत्ताधारी राष्ट्रवादीच्या विरोधात सर्व पक्षीय एकच उमेदवार उतरविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याबाबत उमेदवाराच्या नावाची चर्चा सुरू असून येत्या एक-दोन दिवसांत सर्वपक्षीय उमेदवाराच्या नावाची घोषणा होईल, अशी माहिती भाजयुमोचे गुलचंद व्यवहारे दिली.

Web Title: Ten candidates filed your application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.