शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
3
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
4
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
5
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
6
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
7
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
8
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
9
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
10
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
11
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
12
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
13
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
14
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
15
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
16
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
17
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
18
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
19
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पो टिप्परवर आदळला; ३० भाविक किरकोळ तर ४ गंभीर

By admin | Updated: June 13, 2014 00:38 IST

निगडगा : गतिरोधकावर वाहनाचा वेग कमी करुन ब्रेक लावताच पाठीमागून येणाऱ्या टेम्पोचालकास गतिरोधकाचा अंदाज आला नाही.

निगडगा : गतिरोधकावर वाहनाचा वेग कमी करुन ब्रेक लावताच पाठीमागून येणाऱ्या टेम्पोचालकास गतिरोधकाचा अंदाज आला नाही. यामुळे टिप्परवर टेम्पो आदळला. यात ३० भाविक किरकोळ तर ४ भाविक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात १२ जून रोजी पहाटे दोन वाजता नरसी-मुखेड राज्य मार्गावर होटाळा गावानजीक घडला.गंगाखेड, पालम (जि. परभणी) येथील जवळपास ३० भाविक कंदुरीच्या कार्यक्रमासाठी बडापहाड (आंध्र प्रदेश) येथे टेम्पो (क्र. एमएच-२३-६४४२) ने जात होते. होटाळा गावानजीक पुढे जात असलेल्या वाळू वाहतूक करणाऱ्या टीप्परवर (क्र. एमएच-२४-जे-७२२०) जोरदारपणे आदळला. या अपघातात मुंजाजी तुकाराम भेंडेकर (वय ५०, रा. चिखलवाडी ता. गंगाखेड), सुशीलाबाई उत्तम आवळे (वय ४०, रा. काजलगाव ता. पालम), सुरेश दासू पुळगे (वय २५, रा. परभणी) हे गंभीर जखमी असल्याने नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचारासाठी पाठविले. नंतर नांदेडला सर्व जखमींना पाठविले. अन्य जखमीची नावे अशी-विजयाबाई बापूराव गंजगे (वय ५४), माधव गंगाराम गंजगे (३४), यशवंत मष्णाजी जावेर (३८), दत्ता सटवा खेडेकर (३५), पार्वती आवळे (३०), मंगेश रामा गडगे (९), रविकांत बाळासाहेब भेंडे (१०), लक्ष्मी दत्ता खेडेकर (३०), संतोष दत्ता खेडेकर (९), सावित्रा मारोती बरदेवार (४०), इवलशा शेषराव आवळे (४५), सुमनबाई नागोराव गवाले (६०), सोजरबाई ज्ञानू आवळे (४०), बाळासाहेब शंकर भेंडे (४२), शेषराव आश्रूबा भाऊले (४०), शिवाजी संभाजी भेंडेकर (४२), चंद्रकांत उद्धव तूरनर (२६). जखमीवर नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे बळी देण्यासाठी सोबत घेतलेला बकरा मात्र वाचला. घटनास्थळी भेट देवून नायगाव पोलिस ठाण्याचे पोहेकॉ उमेश कारामुंगे यांनी पंचनामा केला. या प्रकणी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (वार्ताहर)