बाईकमध्ये पेट्रोल भरून रस्ता ओलांडणाऱ्या तरुणास टेम्पोने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 07:23 PM2021-09-17T19:23:12+5:302021-09-17T19:25:01+5:30

खुलताबादहून फुलंब्रीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने चिरडले

The tempo crushed a young man who was crossing the road with petrol in his bike | बाईकमध्ये पेट्रोल भरून रस्ता ओलांडणाऱ्या तरुणास टेम्पोने चिरडले

बाईकमध्ये पेट्रोल भरून रस्ता ओलांडणाऱ्या तरुणास टेम्पोने चिरडले

googlenewsNext

खुलताबाद : पेट्रोल पंपावर बाईकमध्ये पेट्रोल भरून रस्ता ओलांडत असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने दुचाकीस जोरदार धडक दिली. यात  दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. विशाल नामदेव निकम ( ३२ ) असे मृताचे नाव असून हा अपघात आज दुपारी साडेचार वाजेदरम्यान खुलताबाद- फुलंब्री मार्गावरील पेट्रोल पंपासमोर घडला. 

वेरूळ येथील विश्वकर्मा कॉलनीत राहणारा विशाल नामदेव निकम याने खुलताबाद येथील फुलंब्री रोडवरील पेट्रोल पंपावर आपल्या मोटारसायकलमध्ये ( क्रमांक एम.एच. २०डी.यू.०९१४ ) पेट्रोल भरले. त्यानंतर रस्ता ओलांडत असतांना खुलताबादहून फुलंब्रीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने ( क्रमांक  एम.एच.१९ सी.वाय.३५१२ ) त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात विशालचा जागीच मृत्यू झाला. विशालच्या पश्चात आई-वडील व एक भाऊ असा परिवार होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक एस. एम. मेहत्रे, बीट जमादार शेख जाकीर, रतन वारे हे करीत आहेत.

हेही वाचा - संतपीठाचे दिक्षापीठ होऊन आधुनिक संत निर्माण व्हावेत 

Web Title: The tempo crushed a young man who was crossing the road with petrol in his bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.