शिक्षण पंढरीला अवैध धंद्यांचा विळखा
By Admin | Updated: June 26, 2014 00:38 IST2014-06-26T00:22:43+5:302014-06-26T00:38:02+5:30
मोहन बोराडे, सेलू शैक्षणिक दृष्ट्या अग्रेसर असलेल्या सेलू शहरास पोलिस यंत्रणेच्या आशिर्वादामुळे अवैध धंद्यांनी घेरले आहे. त्यामुळे शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या

शिक्षण पंढरीला अवैध धंद्यांचा विळखा
मोहन बोराडे, सेलू
शैक्षणिक दृष्ट्या अग्रेसर असलेल्या सेलू शहरास पोलिस यंत्रणेच्या आशिर्वादामुळे अवैध धंद्यांनी घेरले आहे. त्यामुळे शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सेलू शहरात मटका, जुगार अड्डे जोमात आहेत़
शहरासह ग्रामीण भागात पाहणी केली असता कल्याण-मुंबई नामक मटका, पत्यांचे जुगार अड्डे, अवैध देशी दारू, अवैध वाहतुक आदी अवैध धंदयांचा ऊत आला आहे़ या अवैध धंदयातून दररोज लाखो रूपयाची उलाढाल सुरू आहे़ या सर्व प्रकारा कडे अर्थपुर्ण दुर्लक्ष पोलिस यंत्रणा करत आहे़ सेलू शहरात मुंबई-कल्याण नावाचा मटका जुगार खुलेआमपणे घेतल्या जात आहे़ शहरातील चौक, स्टेशन, बसस्टँन्ड व वर्दळीच्या ठिकाणी बुकी मालकाचे एजंट मटका घेत आहेत़ विशेष म्हणजे काही एजंट तर खुलेआमपणे मटक्याच्या पाट्या देखील लावत आहेत़ सेलू शहरात तब्बल आठ ते दहा वर्षा नंतर खुलेआमपणे मटका घेतल्या जात आहे़ शहरात जवळपास ५० ते ६० ठिकाणी मटका घेतल्या जातो़ तर ग्रामीण भागातूनही मटक्याच्या पट्टया सेलूतील बुकीला पुरविल्या जात आहेत़ शहरात जुन्याच धंद्देवाल्यांनी बुकी सुरू केली आहे़ या बुकीला दररोज लाखो रुपयांची उलाढाल सुरू आहे़ मटका जुगारासह अनेक ठिकाणी पत्याचे अड्डे सुरू आहेत़
शहरासह ग्रामीण भागात अवैध देशी दारू विक्री व अवैध वाहतुक खुलेआमपणे सुरू आहे़ मटका जुगाराचे प्रस्थ वाढल्यामुळे गोरगरीब व युवकही याकडे आकर्षित झाले आहेत़ तसेच मोबाईलहून मटका घेतल्या जात आहे़ हे सर्व प्रकार खुलेआमपणे सुरू असतानाही पोलिस यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत आहे़ शेजारच्या जालना जिल्हयात पोलिस अधीक्षक ज्योतीप्रियासिंह यांनी अवैध धंद्ेवाल्यांना अद्दल घडविल्यामुळे या ठिकाणचे अवैध धंद्दे बंद आहेत त्यामुळे मोठया प्रमाणावर मटका जुगार सेलूत खेळल्या जात आहे़
अवैध धंद्यांतून लाखोंची उलाढाल
मुंबई-कल्याण मटका जुगार, पत्याचे अड्डे व अवैध देशी दारू या अवैध धंदयातून लाखो रूपयांची उलाढाल सुरू आहे़ शहरात जुगार खेळण्यासाठी बाहेर जिल्हयातूनही येणाऱ्यांची संख्या वाढत आहे़ दिवसाकाठी मटका, जुगारातून ५ ते ६ लाख रूपयाची उलाढाल सुरू आहे़ जुने मटकाकिंग एकत्र येवून बुकी चालवित आहे़ अवैध धंदयांना पोलिसांचा आशिर्वाद असल्यामुळे सामान्य नागरिक कोणाकडे दाद मागणार हा प्रश्न आहे़
वाहतूक पोलिस केवळ वसुलीत गुंतलेले असतात त्यामुळे ही वाहने अडविण्याची हिंमत कोणाकडेच नाही़ मटका, जुगारातून लाखो रूपयांचे हफ्ते दिले जातात, अशी चर्चा आहे. हफ्त्यामुळे मटका, जुगार खुलेआमपणे घेतल्या जातो़ बंद करणारेच हातमिळवणी करू लागल्यामुळे मटका, जुगाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़
अवैध देशी दारूच्या विरोधात अनेक गावातील नागरिकांनी निवेदने दिली मात्र याचा काहीही उपयोग झाला नाही़ अवैध वाहतुकीने तर कहरच केला आहे़
तत्कालीन पोलिस अधीक्षक मैथिली झा यांच्या काळात अवैध धंद्यांना आळा घालण्यात आला होता़ परंतु, काही महिन्यांपासून शहरासह तालुक्यात सर्वच अवैध धंद्दे खुलेआमपणे पोलिस यंत्रणेशी अर्थपूर्ण बोलणी नंतर सुरू आहे़ या धंद्यांमुळे अनेकांचे संसार उघडयावर पडण्याची भीती आहे़
एकुणच पोलिस यंत्रणेचा हिरवा कंदील या धंद्यांना असल्याने जुने मटकाकिंग सक्रिय झाले आहेत़ शिक्षणाच्या पंढरीत मटक्याचे आकडे खुलेआमपणे घेतल्या जात असल्यामुळे शिक्षणप्रेमी व नागरिकातून संताप व्यक्त होत आहे़