छत्रपती संभाजीनगर: अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे आणि विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी विजय सीताराम हिवाळे (५०, रा. संघर्षनगर, मुकुंदवाडी) या शिक्षकाला सत्र न्यायाधीश एन.एस. मोमीन यांनी ५ वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड ठोठावला.
सीसीटीव्ही फुटेजमुळे खात्रीहडको येथील शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, विजय हिवाळे प्राथमिक शाळेत इयत्ता ५ वी अ चा वर्गशिक्षक असून तो गणित शिकवत होता. त्याच्याबाबत विद्यार्थ्यांकडून अनेक तोंडी तक्रारी येत होत्या. त्यानंतर फिर्यादींनी शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. ८ एप्रिल २०२३ रोजीच्या फुटेजमध्ये शिक्षक हिवाळे याने विद्यार्थ्यांच्या डोक्यावर छडीने मारहाण केल्याचे, तसेच दोन अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करताना दिसले. मुली अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत असल्याचेही फुटेजमध्ये आढळून आले. याशिवाय, इयत्ता ७ वीतील १३ वर्षीय विद्यार्थ्यांला खाली पडेपर्यंत मारहाण केल्याचा प्रकारही कॅमेऱ्यात दिसला होता. सदर प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्याध्यापकांनी संस्थाचालकाला याबाबत माहिती दिली. त्यांनी स्वतः सीसीटीव्ही फुटेज पाहून प्रकरण गंभीर असल्याचे नमूद करत, तातडीने तक्रार दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार १० जुलै २०२३ रोजी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सुनावणी आणि शिक्षासुनावणीदरम्यान सहायक लोकअभियोक्ता ज्ञानेश्वरी नागुला/डोली यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी विजय हिवाळे याला दोषी ठरवून भादंवि कलम ३५४ (अ), पोक्सो कायदा कलम ८ व १० अन्वये ५ वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त ६ महिन्यांची साध्या कैदेची शिक्षा ठोठावली.
Web Summary : A teacher in Chhatrapati Sambhajinagar received a five-year sentence for sexually harassing minor girls and assaulting a student. CCTV footage confirmed the crimes, leading to his conviction and punishment.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर में एक शिक्षक को नाबालिग लड़कियों के साथ यौन उत्पीड़न और एक छात्र पर हमला करने के लिए पांच साल की सजा सुनाई गई। सीसीटीवी फुटेज से अपराधों की पुष्टि हुई, जिसके बाद उसे दोषी ठहराया गया।