शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शिक्षकाने रचले होते अपहरणाचे कुंभाड

By admin | Updated: February 9, 2015 00:46 IST

केज : १२ जानेवारी रोजी शाळेतून परतताना एका शिक्षकाचे अपहरण झाल्याप्रकरणी केज ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, या शिक्षकाचे अपहरण झाले नव्हते

केज : १२ जानेवारी रोजी शाळेतून परतताना एका शिक्षकाचे अपहरण झाल्याप्रकरणी केज ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, या शिक्षकाचे अपहरण झाले नव्हते तर त्याने तसा बनाव केला होता, असे तपासात रविवारी समोर आले. धक्कादायक हे की, तो एका तरुणाच्या खूनातील आरोपी निघाला.शिवाजी बापू गायकवाड (रा. घाटेवाडी, ता. केज) असे त्या शिक्षकाचे नाव आहे. आसाराम सिताराम हलकडे (वय ३०, रा. घाटेवाडी) हे २० डिसेंबर २०१४ रोजी विडा येथील आठवडी बाजारात आले होते. मात्र, ते घरी परतलेच नाहीत. त्यांच्या नातेवाईकांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार केज ठाण्यात दिली होती. २९ डिसेंबर रोजी शिंदी शिवारात एका विहिरीमध्ये त्यांचे प्रेत आढळून आले. त्यानंतर १२ जानेवारी २०१५ रोजी शिक्षक गायकवाड याने विडा सांगवी रस्त्यावर स्वत:ची कार बेवारस सोडून अपहरणाचे नाट्य केले होते. नातेवाईकांनी गावातीलच काही संशयितांविरूद्ध केज ठाण्यात गुन्हाही नोंद केला होता.दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली तेव्हा गायकवाड याचे अपहरण नव्हे तर बनाव केल्याचे समोर आले. आसाराम हलकडे याच्या खून प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचेही निष्पन्न झाले.आसाराम याला नेमक्या कुठल्या कारणावरून संपविले हे अद्याप समोर आले नाही. (वार्ताहर)मयत आसारामचे वडिल सीताराम हलकडे यांच्या फिर्यादीवरून खंडू लिंबा हलकडे, लिंबा भानुदास हलकडे, विलास अच्युत आरडे, अच्युत ज्योतिबा आरडे, अशोक बाजीराव गायकवाड, शिक्षक शिवाजी बापूराव गायकवाड यांच्याविरूद्ध खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पाचही आरोपी गजाआड असून त्यांची कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.