पैठण रोडवर टँकरने रिक्षाला चिरडले ; ९ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 19:59 IST2018-05-11T19:56:44+5:302018-05-11T19:59:54+5:30
: पैठण रोडवरील गेवराई तांड्याजवळ सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पाण्याच्या टँकरने रिक्षाला चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला.

पैठण रोडवर टँकरने रिक्षाला चिरडले ; ९ जणांचा मृत्यू
औरंगाबाद : पैठण रोडवरील गेवराई तांड्याजवळ सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पाण्याच्या टँकरने रिक्षाला चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला. तर, दोघे गंभीर जखमी आहेत. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शहराजवळील गेवराई तांड्याजवळ संध्याकाळी सहाच्या सुमारास एका पाण्याच्या टँकरचे ब्रेक निकामी झाल्याने अनियंत्रित झाले. यातच समोरून येणाऱ्या एका अपे रिक्षाला चिरडत ते पुढे गेले. अपे रिक्षावर टँकर चढल्याने त्यातील प्रवासी दबले गेले. नागरिकांनी बचाव कार्य करत जखमींना बाहेर काढले. जखमींना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथेच उपचारा दरम्यान ९ जणांचा मृत्यू झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.