शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेताना तलाठी गजाआड

By admin | Updated: May 8, 2014 23:20 IST

लातूर : सय्यदपूर येथील येथील एका शेतकर्‍यास वाटणीपत्राद्वारे जमीन नावे करुन देण्यासाठी १ हजार रुपयांची लाच घेताना धनेगाव सज्जाच्या तलाठ्यास गुरुवारी रंगेहात पकडले आहे़

 लातूर : देवणी तालुक्यातील सय्यदपूर येथील येथील एका शेतकर्‍यास वाटणीपत्राद्वारे जमीन नावे करुन देण्यासाठी १ हजार रुपयांची लाच घेताना धनेगाव सज्जाच्या तलाठ्यास गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे़ याप्रकरणी देवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सय्यदपूर येथील एका शेतकर्‍याचे व त्याच्या भावाच्या नावे सर्वे नंबर ८५, ८६, ८९ व ९१ मध्ये शेती आहे़ ही शेती वाटणीपत्राआधारे तक्रारदार शेतकरी, त्याची पत्नी, भाऊ, भावजय व वडिलांच्या नावाने करुन वरिष्ठांकडून तसा फेरफार मंजूर करुन देण्याचा अर्ज तक्रारदाराने धनेगाव सज्जाचे तलाठी माधव अर्जून बिरादार यांच्याकडे दिला होता़ मात्र त्यांनी या कामासाठी १ हजार रुपयांची लाच मागितली़ यासंदर्भात शेतकर्‍याने लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती़ त्यानुसार ८ मे रोजी अ‍ॅन्टीकरप्शनचे उपाधीक्षक एऩ जी़ अंकुशकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि़ पंकज भालेराव, अभिमन्यू साळुंके, पोहेकॉ़ विलास मलवाडे, अशोक गायकवाड, मुख्तार शेख, परमेश्वर अभंगे, बालाजी जाधव, सदानंद योगी, नानासाहेब जाधवर, विष्णू गंडरे, स्वामी यांच्या पथकाने वलांडी येथील तलाठी सज्जा येथे सापळा रचला़ यावेळी तलाठी माधव बिरादार हे तक्रारकर्त्याकडून १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात सापडले़ (प्रतिनिधी)