साताबाऱ्यावर नोंदीसाठी पाच हजारांची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 07:47 PM2021-06-22T19:47:36+5:302021-06-22T19:48:00+5:30

तक्रारदार यांनी काही दिवसांपूर्वी नवीन रो हाऊस खरेदी केले आहे. या रो हाऊसची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी मागितली लाच

Talathi caught by ACB while accepting bribe of Rs 5,000 for registration on Satabari | साताबाऱ्यावर नोंदीसाठी पाच हजारांची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात

साताबाऱ्यावर नोंदीसाठी पाच हजारांची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात

googlenewsNext

औरंगाबाद : नुकत्याच खरेदी केलेल्या रो हाऊसची साताबाऱ्यावर फेरफार नोंद घेण्यासाठी तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना पंढरपूर सजाच्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई वळदगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे २२ जून रोजी दुपारी करण्यात आली. पुमनसिंग बंकटसिंग डाेंगरजाळ (५७,रा. रा. वेदवाडी, ता.वैजापुर), असे आरोपी तलाठ्याचे नाव आहे.

तक्रारदार यांनी काही दिवसांपूर्वी नवीन रो हाऊस खरेदी केले आहे. या रो हाऊसची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी त्यांनी पंढरपूर सजाचे तलाठी डोंगरजाळ यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी प्रती रो हाऊस सातबारा नोंद करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार आणि त्यांच्या शेजार्याच्या सातबार्याची नोंद करण्यासाठी सहा हजार रुपये लागणार होते. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी डोंगरजाळची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. 

पोलीस उपअधीक्षक ब्र्म्हदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गणेश धोकरट, हनुमंत वारे, हवालदार सुनील पाटील, बाळासाहेब राठोड, रवींद्र काळे, केवलसिंग घुसिंगे आणि चालक चांगदेव बागुल यांच्या पथकाने सापळा लाचेच्या मागणीची पडताळणी केली. तेव्हा तक्रारदार यांनी केलेल्या विनंतीवरुन आरोपी डोंगरजाळ यांनी त्यांच्या कामाचे दोन हजार रुपये आणि शेजाऱ्याच्या रो हाऊसच्या कामासाठी तीन हजार असे एकूण पाच हजार रुपये मागितले. ठरल्यानुसार आरोपीने तक्रारदार यांना वळदगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगितले. साध्या वेशातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सापळा रचलेला होता. तेथे तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये लाच घेताच डोंगरजाळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले. आरोपीविरूद्ध सातारा ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Talathi caught by ACB while accepting bribe of Rs 5,000 for registration on Satabari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.