शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

सुटीच्या दिवशीही तलाठी सज्जावर गर्दी

By admin | Updated: July 30, 2014 00:48 IST

परळी: रमजान ईदची सुटी असतानाही परळीतील माणिकनगर भागात असणाऱ्या तलाठी सज्जांवर

परळी: रमजान ईदची सुटी असतानाही परळीतील माणिकनगर भागात असणाऱ्या तलाठी सज्जांवर राष्ट्रीय कृषी पीक विमा काढण्यासाठी पीकपेरा व आठ अ चा उतारा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. तालुक्यातील बहुतांश तलाठी सज्जांचे कार्यालय माणिकनगर भागातच आहेत. शेतकऱ्यांच्या गर्दीमुळे या भागाला यात्रेचे स्वरुप आले होते.तालुक्यात मागील दोन महिन्यांपासून पाऊस नसल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या. मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे नुकसान होऊ शकते. पीक विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळून शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. यामुळे शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या मूग, तूर, कापूस आदी पिकांचा तातडीने पीक विमा भरुन घेण्यासाठी लगबग सुरू केली आहे.तलाठी कार्यालयावर उड्यापीक पेरा व आठ अ चा उतारा उपलब्ध करुन घेण्यासाठी मंगळवारी तलाठी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांची गर्दी झाली होती. नंदागौळ तलाठी सज्जांतर्गत येणाऱ्या तलाठी कार्यालयात सकाळी सात वाजल्यापासूनच गर्दी केली होती. बेलंबा तलाठी सज्जाचीही यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. दोन्ही तलाठी वेळेवर न आल्याने शेतकरी आक्रमक झाले होते.शेतकरी आक्रमकशिवाजी गित्ते, भालचंद्र कांदे, महादेव गित्ते, संतोष परांडे, योगीराज गित्ते या शेतकऱ्यांनी महसूल अधिकाऱ्यांकडून अवहेलना होत असल्याचा आरोप केला. नंदागौळ, चांदापूर, वाघाळा, गोपाळपूर, बेलंबा आदी ठिकाणचे शेतकरी तलाठ्यांच्या प्रतीक्षेत होते. काही शेतकऱ्यांनी आक्रमकपणा घेत उपजिल्हाधिकारी सविता चौधरी, नायब तहसीलदार बी.एल. रुपनर यांच्याकडे तक्रारी केल्या. पाच तासानंतर तलाठी सज्जावर दाखल झाले. त्यानंतर शुक्रवारी लिहिलेला पीक पेरा व आठ अच्या उताऱ्याचे वाटप केले.नंदागौळ व बेलंबा हे तलाठी कार्यालय ८ बाय ८ च्या खोलीत आहेत. या अंतर्गतच १५ गावांचा कारभार चालतो. (वार्ताहर)