देवगिरी किल्ल्यावर उद्या स्वराज्य प्रेरणा दिन, नगरनाका ते दौलताबाद मार्ग जड वाहनांसाठी बंद 

By सुमित डोळे | Updated: July 24, 2024 19:46 IST2024-07-24T19:44:40+5:302024-07-24T19:46:41+5:30

या दरम्यान नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

Swarajya Prerna Day tomorrow at Devagiri Fort, Nagarnaka to Daulatabad road closed for heavy vehicles  | देवगिरी किल्ल्यावर उद्या स्वराज्य प्रेरणा दिन, नगरनाका ते दौलताबाद मार्ग जड वाहनांसाठी बंद 

देवगिरी किल्ल्यावर उद्या स्वराज्य प्रेरणा दिन, नगरनाका ते दौलताबाद मार्ग जड वाहनांसाठी बंद 

छत्रपती संभाजीनगर : दौलताबादच्या देवगिरी किल्ल्यावर स्वराज्य प्रेरणा दिन साजरा करण्यात येणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात शहरातून विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होतील. यामुळे दौलताबाद मार्गावर वाहतूकीची कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी गुरुवारी  (२५ जुलै) सकाळी ९ वाजेपासून कार्यक्रम संपेपर्यंत नगरनाका ते दौलताबाद टी पॉईंट ते दौलताबाद घाट हा मार्ग मद्यम व जड वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे निरीक्षक अशोक भंडारे यांनी सांगितले. या दरम्यान नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

असे असतील पर्यायी मार्ग 
-दौलताबाद टी पॉईंट ते माळीवाडा, फातियाबाद, जांभाळा गाव, कसाबखेडा, वेरुळ मार्गे पुढे जातील व येतील. 
-दौलताबाद टी ते माळीवाडा, सोलापुर-धुळे महामार्गे पुढे जातील व येतील. 
-धुळे, नाशिककडे जाणारी वाहने नगरनाका मार्गे ए. एस. क्लब, सोलापुर धुळे महामार्ग तसेच साजापुर, करोडी, करोडी, शरणापुर फाटा, दौलताबाद टी, माळीवाडा मार्गे पुढे जातील व येतील.

Web Title: Swarajya Prerna Day tomorrow at Devagiri Fort, Nagarnaka to Daulatabad road closed for heavy vehicles