शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

शंकर सिटीकर सेवेतून निलंबित; ‘आयजीं’चे आदेश

By admin | Updated: December 20, 2015 23:35 IST

हिंगोली : जिल्हा पोलिस दलांतर्गत गोरेगाव ठाण्यात नेमणुकीस असलेले पो.निरीक्षक शंकर सिटीकर यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

हिंगोली : जिल्हा पोलिस दलांतर्गत गोरेगाव ठाण्यात नेमणुकीस असलेले पो.निरीक्षक शंकर सिटीकर यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. सिटीकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचा कार्यभार सांभाळला होता. काही महिन्यांपूर्वी पोलिस अधीक्षक सुधीर दाभाडे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर कैलास कणसे रुजू झाले. त्यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची खांदेपालट करताना पोनि शंकर सिटीकर यांना गोरेगाव ठाण्यात पाठविले. दरम्यान सेवानिवृत्ती जवळ आल्याने विनंतीवरून मुख्यालयात बदलीसाठी सिटीकर यांनी प्रयत्न केले होते. दिवाळीनंतर गोरेगाव ठाणे हद्दीतील सहा ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम सुरू झाला. त्या दरम्यान कायदा व सुुव्यवस्थेचा प्रश्नही तळणी येथे उद्भवला होता. गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होवून दोन गटातील तणाव वाढलेला असताना अशा स्थितीत प्रकृती अस्वास्थ्याचे कारण दाखवून पोनि सिटीकर हे सिकवर गेले होते. विशेष म्हणजे त्यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना तोंडी अथवा लेखी सूचना न देताच परस्पर मुख्यालय सोडले होते. याबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष महानिरीक्षकांकडे पाठविला होता. त्यावरुन पोनि शंकर सिटीकर यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी निघालेल्या आदेशाची प्रत हिंगोलीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शनिवारी मिळाली. निषेधाचे निवेदन हिंगोली : नागपुरातील मातंग समाजाच्या मोर्चावर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध करून साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे स्मृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागणीचे निवेदन दिले. त्यावर अध्यक्ष दत्ता गायकवाड, अनिल खंदारे, कैलास शिखरे, कोंडबा खंदारे यांच्या सह्या आहेत.