शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

'मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधीक्षकांना निलंबित करा'

By बापू सोळुंके | Updated: September 1, 2023 21:15 IST

मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांकडून तीव्र निषेध

छत्रपती संभाजीनगर: जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी अचानक लाठीहल्ला. या घटनेचा मराठा समाजातील प्रमुख नेत्यांनी तीव्र शब्दात निषेघ केला.सरकारकडून आरक्षणाची अपेक्षा असताना अशाप्रकारे लाठीहल्ला करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न निषेधार्थ असल्याच्या प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिल्या आहेत.

आंदोलन आणखी ताकदीने उभे राहील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या पुरूष आणि माता भगिनींवर लाठी चार्ज केला आहे. आंदोलन दडपल्याने अजून ताकदीने ते उभे राहील. केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहेत, त्यांनी संसदेत कायदा आणून ५० टक्के आरक्षणाची मर्यादा शिथिल केली पाहिजे. तसेच जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणी सर्वस्वी सरकार जबाबदार असून पोलीस अधीक्षकांची असल्याने त्यांच्यावर  निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. - आ. अंबादास दानवे, विरोधीपक्षनेते, विधान परिषद.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा निषेध शांततेत उपोषण करणाऱ्या मराठा बांधवावर झालेल्या लाठीहल्ल्याचा संभाजी ब्रिगेडच्यावतीने जाहिर निषेध करतो.  संबंधित पोलीस अधीक्षकांना निलंबित केले पाहिजे.  राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाशिवाय हा लाठी हल्ला पोलीस करू शकत नाही. अशा पद्धतीने जाणीवपूर्वक  दडपशाही राज्यसरकार करीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आम्ही निषेध करतो.  देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे, न दिल्यास संभाजी ब्रिगेड आमच्या स्टाईलने धडा शिकवेल. यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी राज्यसरकार जबाबदार असेल.- प्रा. शिवानंद भानुसे,प्रवक्ता,संभाजी ब्रिगेड.

उद्रेक होतच राहणारमराठा आरक्षणाबाबत सर्वच राजकीय पक्षांनी समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. आरक्षणाची मागणी लावून धरणाऱ्या  आंदोलकांवर सरकारने केलेल्या लाठी हल्ल्याचा मी निषेध करतो.  मराठा आरक्षण कसे देणार, हे आधी राज्यसरकारने तातडीने स्पष्ट करावे अन्यथा  असा उद्रेक होतच राहणार. दुसरीकडे माझी मराठा समाज बांधवांना अशी विनंती आहे की आरक्षणाची लढाई आपण ज्या शांततामय आणि कायदेशीर मार्गाने लावून धरली होती, तशीच ती नेटाने लावून पुढे नेत राहू यात आपण तसूभरही मागे हटणार नाही.  मराठा आरक्षणाचे आंदोलन आपल्याला शांततेनेच करायचे आहे . या आंदोलनाला गालबोट  लागू देऊ नका,असे आवाहन आहे.- विनोद पाटील, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक.

पोलिसांनी अचानक लाठीहल्ला केलामी सुरेश वाकडे, सखाराम काळे यांच्यासह साडेतीन वाजता आंतरवालीत पोहचलो, तेव्हा आंतरवाली गावाला पोलिसांनी वेढा दिलेला होता. आंदोलकांना दुपारी उचलण्याचा प्लॅन होता. उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने  त्यांचे चेकअप केले. तेव्हा त्यांच्यावर मंडपातच उपचार सुरू झाले होते. यानंतर अवघ्या काही मिनिटात पोलिसांनी अचानक लाठीहल्ला सुरू केला. अश्रुधुरांच्या कांड्या फोडल्या आणि हवेत गोळीबार केला. या लाठीहल्ल्याला आंदोलकांनी प्रत्यूत्तर दिले. - प्रा. चंद्रकांत भराट.

सर्वांना बडतर्फ करावेजालना  जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे शांततेत उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर ज्या अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले आणि ज्यांनी लाठीचार्ज केला अशा सर्वांना बडतर्फ करावे. जालना येथे मराठा आरक्षणासंदर्भात उपोषणकर्त्यांवर गावकऱ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा मी जाहीर निषेध करतो. - अभिजीत देशमुख.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaratha Reservationमराठा आरक्षणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस