इंडियन डेंटल असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुषमा सोनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 21:21 IST2019-01-20T21:21:43+5:302019-01-20T21:21:59+5:30
इंडियन डेंटल असोसिएशनच्या औरंगाबाद शाखेच्या अध्यक्षपदी सुष्मा सोनी यांची निवड झाली. औरंगाबाद शाखेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या त्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या.

इंडियन डेंटल असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुषमा सोनी
औरंगाबाद : इंडियन डेंटल असोसिएशनच्या औरंगाबाद शाखेच्या अध्यक्षपदी सुष्मा सोनी यांची निवड झाली. औरंगाबाद शाखेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या त्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या. शाखेच्या सचिवपदी डॉ. राजेश जंबुरे, तर पुढील वर्षाचे अध्यक्ष म्हणून डॉ. अभिजीत चपळगावकर यांची निवड झाली. सर्व पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा रविवारी पार पडला.
पदग्रहण सोहळ्याप्रसंगी औरंगाबाद शाखेचे मावळते अध्यक्ष डॉ. राजन महिंद्रा, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. पी. डांगे, डॉ. एस. सी. भोयर, ‘आयएमए’चे अध्यक्ष कुलदिपसिंग राऊळ, सचिव डॉ. यशवंत गाडे, हेडगेवार रुग्णालयाचे डॉ. सतीश कुलकर्णी, धूत हॉस्पीटलचे डॉ. हिमांशु गुप्ता आदींची उपस्थिती होती. यावेळी शहरातील डॉक्टरांची उपस्थिती होती.
‘आयडीए’ची उर्वरित कार्यकारिणी अशी आहे. उपाध्यक्ष डॉ. सिमीत शहा, डॉ. विजयकुमार गिºहे, संयुक्तसचिव डॉ. समिना बाकरी, सहसचिव डॉ. अनिरुद्ध देशपांडे, कोषाध्यक्ष डॉ. प्रणव महाजन, सहकोषाध्यक्ष डॉ. प्रितम शेलार, प्रसिध्दी प्रमुख डॉ. शिरीष खेडगीकर यांच्यासह डॉ. पूर्वा अजमेरा, डॉ. प्राची गिºहे, डॉ. सय्यद मोहम्मद अली, डॉ. अनिकेत बिडवे, डॉ. गुलझार कुडचिवाला, डॉ. अंकुश बुब, डॉ. सुशिल बनसोडे, डॉ. तुषार खियानी, डॉ. सोनिया सोधी, डॉ. महिंद्रा हंडा, डॉ. शांता कोरगावकर, डॉ. प्राजक्ता बिनायके, डॉ. अनुप चोलेपाटील, डॉ. गोविंद चांगुले, डॉ. अपेक्षा धुळे यांच्यासह अन्य डॉक्टरांची कार्यकारिणीत विविध पदांवर निवड झाली आहे.
शिक्षणात अडचणी- सौरव बॅनर्जी
पदग्रहण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात थ्रीडी टेक्नॉलॉजी व अॅडव्हान्स रुट कॅनॉल उपचाराची प्रात्यक्षिके मायक्रो इंडो डेंटिस्ट डॉ. सौरव बॅनर्जी यांनी सादर केली. देशाबाहेर रुग्ण व दंततज्ज्ञांना विमा संरक्षण मिळते. भारतातील दंततज्ज्ञदेखील जागतिक पातळीवर ठसा उमटवीत आहेत. परंतु आपल्याकडे शासन कोणतीही मदत करीत नाही. शासकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना रुट कॅनॉल शिकण्यासाठी आवश्यक सामग्री नसल्याची परिस्थिती विदारक आहे,असेही ते म्हणाले.