कुष्ठरोग निर्मूलनअंतर्गत शहरातील ४१ वसाहतींमध्ये सर्वेक्षण

By | Updated: November 29, 2020 04:05 IST2020-11-29T04:05:42+5:302020-11-29T04:05:42+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान, सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहिमेसंदर्भात जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक शुक्रवारी पार पडली. बैठकीला मुख्य कार्यकारी ...

Survey of 41 colonies in the city under leprosy eradication | कुष्ठरोग निर्मूलनअंतर्गत शहरातील ४१ वसाहतींमध्ये सर्वेक्षण

कुष्ठरोग निर्मूलनअंतर्गत शहरातील ४१ वसाहतींमध्ये सर्वेक्षण

जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान, सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहिमेसंदर्भात जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक शुक्रवारी पार पडली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.एस. शेळके, आरोग्यसेवा (कुष्ठरोग) विभागाचे सहायक संचालक डॉ. ए.बी. धानोरकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, डॉ. विजयकुमार वाघ, डॉ. अविनाश बोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीतील सूचनांनुसार आता पालिका प्रशासनाने सर्वेक्षणाचे नियोजन केले आहे.

शहरात पावणेतीन लाख नागरिकांची तपासणी

जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार पालिकेने शहरातील कुष्ठरोग व क्षयरोग संशयितांचे सर्वेक्षण करण्याची तयारी पूर्ण केली आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील कुष्ठरोग व क्षयरोगाच्या दृष्टीने दाट लोकवस्ती असलेल्या प्रमुख ४१ वसाहतींमध्ये सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी १५७ पथके तयार केली आहेत. ४६ सुपरव्हायझरच्या नियंत्रणाखाली ही पथके काम करतील. या पथकांकरवी शहरातील ५४ हजार ९३० घरांचे सर्वेक्षण केले जाईल. त्यात २ लाख ७४ हजार ६५१ नागरिकांची तपासणी केली जाईल.

शहरात कोणत्या वसाहतींत होणार सर्वेक्षण

नारेगाव, मिसारवाडी, कैलासनगर, चिकलठाणा, जयभवानीनगर, मुकुंदवाडी, हर्षनगर, जवाहर कॉलनी, राजनगर, पीरबाजार, भीमनगर, सातारा- देवळाई, विजयनगर, बायजीपुरा, एन-८ सिडको, एन-११, गांधीनगर, शहाबाजार, शिवाजीनगर, नक्षत्रवाडी, भवानीनगर, बन्सीलालनगर, आरेफ कॉलनी, गरम पाणी, जिन्सी, मसनदपूर, पुंडलिकनगर, छावणी, सादातनगर, भावसिंगपुरा, नेहरूनगर, कैसर कॉलनी, जुनाबाजार, क्रांतीचौक, सिल्कमिल कॉलनी, हर्सूल, चेननानगर, अंबिकानगर.

Web Title: Survey of 41 colonies in the city under leprosy eradication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.