सखी मंच सदस्यांसाठी ‘सरीवर सरी ’ कार्यक्रम
By Admin | Updated: June 22, 2014 00:04 IST2014-06-21T23:22:52+5:302014-06-22T00:04:33+5:30
बीड: ‘लोकमत सखी मंच’ च्या वतीने सदस्यांसाठी ‘सरीवर सरी’ या हिंदी, मराठी बहारदार गाण्यांच्या कार्यक्रम अयोजित करण्यात आला आहे.

सखी मंच सदस्यांसाठी ‘सरीवर सरी ’ कार्यक्रम
बीड: ‘लोकमत सखी मंच’ च्या वतीने सदस्यांसाठी ‘सरीवर सरी’ या हिंदी, मराठी बहारदार गाण्यांच्या कार्यक्रम अयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम आज शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी ५ होणार आहे.
‘सरीवर सरी’ या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत गायकांची हजेरी लागणार आहे. कार्यक्रमामध्ये पाऊस गाण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी सखी मंच सदस्यांनी कार्यक्रमाला येताना ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. तसेच लहान मुलांना या कार्यक्रमात प्रवेश नाही. या कार्यक्रमाचे प्रायोजक सचिन ज्वेलर्स हे आहेत. हा कार्यक्रम रविवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातून सखी मंचच्या सदस्यांना एकापेक्षा एक अशी बहारदार गाण्यांचा लाभ मिळणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन ‘लोकमत’ सखीमंचच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)