सुपर! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘डिक्टिन्शन’मध्ये ३६.१५ टक्के विद्यार्थी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 17:20 IST2025-05-14T17:19:06+5:302025-05-14T17:20:13+5:30
जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९३.६० टक्के; ३६.१५ टक्के विद्यार्थी प्रावीण्य, प्रथम श्रेणीत ३४.४४ टक्के उत्तीर्ण

सुपर! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘डिक्टिन्शन’मध्ये ३६.१५ टक्के विद्यार्थी
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा निकाल ९३.६० टक्के लागला. जिल्ह्यातील ६६ हजार ६२६ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ६२ हजार ३६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे यंदा प्रथम श्रेणीपेक्षा प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या म्हणजे ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. तब्बल २२ हजार ५४६ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत, तर २१ हजार ४८५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
जिल्ह्यात द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण (४५ ते ५९.९९ टक्के गुण घेणारे) विद्यार्थ्यांची संख्या सुमारे १४ हजार ३७५ आहे, तर तृतीय श्रेणी ( ३५ ते ४४.९९ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण ) विद्यार्थ्यांची संख्या ३ हजार ९६० आहे. ही टक्केवारी अवघी ६.३४ टक्के आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना भरभरून गुण मिळाल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात उत्तीर्ण होण्यात मुलीच आघाडीवर आहेत. शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या निकालानुसार जिल्ह्यात सिल्लोड तालुक्याचा सर्वाधिक ९६.८९ टक्के निकाल लागला. सर्वांत कमी निकाल पैठण तालुक्याचा ९२.१४ टक्के लागला. यंदा जिल्ह्याचा निकाल ९३.६० टक्के लागलेला असताना मागील वर्षी हाच निकाल ९५.५१ टक्के होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १.९१ टक्क्यांनी निकाल घसरला. काॅपीमुक्त अभियानामुळे निकालात घट झाल्याची चर्चा आहे. जिल्ह्यात एका परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळला होता, तर परीक्षेनंतर ११ गैरमार्गाचे प्रकरणे समोर आली. यात उत्तरपत्रिका फाडणे, अक्षरात बदल, रेषा मारणे आदी प्रकारांचा समावेश आहे.
जिल्ह्याचा निकाल
नोंदणी केलेले विद्यार्थी - ६६, ९८२
परीक्षा दिलेले विद्यार्थी - ६६, ६२६
उत्तीर्ण विद्यार्थी - ६२, ३६६
टक्केवारी- ९३.६० टक्के
उत्तीर्ण मुले-३३,८९१ (९१.७७ टक्के)
उत्तीर्ण मुली - २८,४७५ (९५.८८ टक्के)
जिल्ह्यातील श्रेणीनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी संख्या
श्रेणी - उत्तीर्ण विद्यार्थी
प्रावीण्य श्रेणी- २२,५४६ (३६.१५ टक्के)
प्रथम श्रेणी - २१,४८५ (३४.४४ टक्के)
द्वितीय श्रेणी- १४,३७५ (२३.०४ टक्के)
उत्तीर्ण - ३,९६० (६.३४ टक्के)
एकूण उत्तीर्ण - ६२, ३६६
-------
तालुक्यानिहाय जिल्ह्याचा निकाल
१) छत्रपती संभाजीनगर
परीक्षार्थी-२७,३६०
उत्तीर्ण-२५,५२५
टक्केवारी-९३.२९ टक्के
उत्तीर्ण मुले- १३, ६६७ (९१.६२ टक्के)
उत्तीर्ण मुली- ११,८५८ ( ९५.२९ टक्के)
-------
२) गंगापूर
परीक्षार्थी- ९,००३
उत्तीर्ण- ८,३४७
टक्केवारी-९२.७१ टक्के
उत्तीर्ण मुले- ४,५९० (९०.९९ टक्के)
उत्तीर्ण मुली-३,७५७ (९४.८९ टक्के)
-------
३) कन्नड
परीक्षार्थी-५,६२३
उत्तीर्ण-५,२०३
टक्केवारी-९२.५३ टक्के
उत्तीर्ण मुले-२,७७५ (८९.६३ टक्के)
उत्तीर्ण मुली-२,४२८ (९६.०८ टक्के)
------
४) खुलताबाद
परीक्षार्थी-२,५४५
उत्तीर्ण-२,४१४
टक्केवारी-९४.८५ टक्के
उत्तीर्ण मुले-१,३८५ (९३.४५ टक्के)
उत्तीर्ण मुली-१,०२९ (९६.८० टक्के)
-------
५) पैठण
परीक्षार्थी-५,९२२
उत्तीर्ण-५,४५७
टक्केवारी-९२.१४ टक्के
उत्तीर्ण मुले- २,९९६ (८९.४८ टक्के)
उत्तीर्ण मुली- २,४६१ ( ९५.६१ टक्के)
------
६) सिल्लोड
परीक्षार्थी-६,७५३
उत्तीर्ण-६,५४३
टक्केवारी - ९६.८९ टक्के
उत्तीर्ण मुले - ३,५२१ ( ९५.९१ टक्के)
उत्तीर्ण मुली-३,०२२ (९८.०५ टक्के)
--------
७) सोयगाव
परीक्षार्थी-१,५४३
उत्तीर्ण-१,४४०
टक्केवारी- ९३.३२ टक्के
उत्तीर्ण मुले-८४१ (९१.४१ टक्के)
उत्तीर्ण मुली-५९९ (९६.१४ टक्के)
--------
८) वैजापूर
परीक्षार्थी-४,६१५
उत्तीर्ण-४,३८०
टक्केवारी-९४.९० टक्के
उत्तीर्ण मुले- २,३९० (९२.८५ टक्के)
उत्तीर्ण मुली-१,९९० (९७.५० टक्के)
--------
९) फुलंब्री
परीक्षार्थी-३,२६२
उत्तीर्ण-३,०५७
टक्केवारी-९३.७१ टक्के
उत्तीर्ण मुले- १,७२६ (९१.९५ टक्के)
उत्तीर्ण मुली-१,३३१ (९६.१० टक्के)
नव्याने यश संपादन करा
गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी १४ ते २८ मे पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. जून-जुलैमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी १५ मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन आवेदनपत्र भरून घेण्यात येईल. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नव्या उमेदीने यश संपादन करावे.
- अनिल साबळे, विभागीय अध्यक्ष, विभागीय मंडळ