स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 12:39 IST2021-06-03T12:39:28+5:302021-06-03T12:39:47+5:30

स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तरुण एस. बी. कॉलनीत खोली भाड्याने घेऊन राहात होता.

Suicide of a young man preparing for a competitive exam | स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

औरंगाबाद: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना एस. बी. कॉलनीत बुधवारी दुपारी झाली. याप्रकरणी क्रांती चौक ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

परमेश्वर बापूराव चव्हाण (२७) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, परमेश्वर हा स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी एस. बी. कॉलनीत खोली भाड्याने घेऊन राहात होता. बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास परमेश्वरने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सायंकाळी समोर आल्यावर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी परमेश्वरला बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले. अपघात विभागाच्या डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. हवालदार तांदळे तपास करीत आहेत.

Web Title: Suicide of a young man preparing for a competitive exam