नंद्राबाद येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 11:53 IST2019-08-29T11:52:46+5:302019-08-29T11:53:20+5:30

खटकाळी तलावाशेजारील वस्तीवरील घटना

Suicide Of woman in Nandrabad | नंद्राबाद येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

नंद्राबाद येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

खुलताबाद: नंद्राबाद येथील खटकाळी तलावाशेजारील झाडास गळफास घेऊन एका 40 वर्षीय विवाहितेने आत्महत्या हत्या. गुरुवारी (दि. २९ ) सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, नंद्राबाद येथील खटकाळी तलावाशेजारी काही लोक वस्ती करून राहतात. आज सकाळी येथील ताराबाई गोरख मोरे (40) या विवाहितेने तलावाशेजारील झाडाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वस्तीवरील नागरिकांना आढळून आले. त्यांनी लागलीच यांची माहिती खुलताबाद पोलिसांना दिली. यानंतर बीट जमादार यतीन कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह खुलताबाद ग्रामीण रूग्णालयात पाठवला. वैद्यकिय अधिकारी डॉ.अमर गजराज यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईंकाच्या ताब्यात दिला. 

Web Title: Suicide Of woman in Nandrabad