आत्महत्या की घातपात ! गेवराई तांडा परिसरातील विहिरीत दोन चिमुकल्यांसह मातेचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 17:50 IST2021-04-15T17:48:37+5:302021-04-15T17:50:47+5:30
Mother and two childrens death body found in well : ही आत्महत्या आहे अथवा अन्य घातपाताचा प्रकार याविषयी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

आत्महत्या की घातपात ! गेवराई तांडा परिसरातील विहिरीत दोन चिमुकल्यांसह मातेचा मृतदेह आढळला
औरंगाबाद: गेवराई तांडा येथील विहिरीत दोन चिमुकल्यासह मातेचा मृतदेह आज सकाळी आढळून आला आहे . वैशाली रविंद्र थोरात (२७),आरोही (४) आणि आयुष (वय दिड वर्ष , सर्व रा. क्रांतीनगर ) अशी मयताची नावे आहेत. वैशाली यांनी दोन चिमुकल्यासह आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आज दुपारी गेवराई तांडा येथील देसरडा यांच्या शेतातील विहिरीत आज सकाळी दोन चिमुकल्यांसह मातेचा मृतदेह आढळून आल्यानंतर घटनेची माहिती चिकलठाणा पोलीस आणि अग्निशामक दलाला देण्यात आली. अग्निशामक अधिकारी विजय राठोड आणि अन्य जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन वैशाली, आरोही आणि आयुष यांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले .
घटनास्थळी मयताचे नातेवाईक जमा झाले असून त्यांनी ही मृतदेह पाहून एकच हंबरडा फोडला. ही आत्महत्या आहे अथवा अन्य घातपाताचा प्रकार याविषयी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आत्महत्या असेल तर कारण काय हे अद्याप स्पष्ट झाले नाही.