शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

प्रेयसीने छळल्याने विवाहित तरुणाची आत्महत्या; तरुणी व तिचा दुसरा प्रियकर अटकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 5:23 PM

Suicide of a married youth due to harassment by his girlfriend औरंगाबाद तालुक्यातील जळगाव फेरण शिवारात दि.9 एप्रिल रोजी दुपारी शरद शेळके या तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

करमाड : प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीने आर्थिक लुबाडणूक केल्याने नैराश्यातून एका विवाहित तरुणाने किरण जळगाव येथील शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी ( दि. ९) दुपारी उघडकीस आली. शरद उत्तमराव शेळके (३४) असे मृत तरुणाचे नाव असून तो विष्णूनगर येथे राहत असे. या प्रकरणी शरदच्या वडिलांनी शुक्रवारी रात्री उशिरा फिर्याद दिली. पोलिसांनी तरुणी व तिच्या दुसऱ्या प्रियकरास अटक केली आहे. 

औरंगाबाद तालुक्यातील जळगाव फेरण शिवारात दि.9 एप्रिल रोजी दुपारी शरद शेळके या तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. गावातील तरुणांच्या मदतीने शरदला बाहेर काढून औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. दरम्यान, शरदने लिहिलेली आठ ते दहा पानांची एक सुसाईड नोट करमाड पोलिसांना मिळाली. सुसाईड नोटमध्ये शरदने त्याच्या 21 वर्षीय अविवाहित प्रेयसी व तिच्या दुसऱ्या प्रियकाराच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. पोलिसांनी प्रेमिका आणि तिच्या अल्पवयीन प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रेयसीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आले आहेत. तिचा प्रियकर अल्पवयीन असल्याने बाल न्याय मंडळात दोषारोप दाखल करणार असल्याचे करमाड पोलिसांनी सांगितले आहे. 

आर्थिक लुबाडणूक करून दिली जीवे मारण्याची धमकीसुसाईड नोटनुसार, साक्षी (नाव बदलेले आहे) ही तरुणी शरदच्या घरासमोर राहते. तिने शरदसह अनेकांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले आहे. साक्षीचे २०२० पासून शरद सोबत प्रेमसंबंध होते. तिने विविध कारणे सांगून त्याच्याकडून जवळपास नऊ ते दहा लाख रुपये उकळलेले. यामुळे तो कर्जबाजारी झाला होता. पुढे शरदने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर साक्षीने त्यास ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. दरम्यान, ३ जानेवारीस साक्षीने कॉल करून शरदला आपले प्रेम संबंध संपले आहेत. माझे दुसऱ्या एकावर प्रेम आहे, त्याच्याकडे पिस्तूल आहे. माझे ऐकले नाही तर तुला जीवे मारेल अशी धमकी दिली. तिच्यामुळे माझे दोन्ही मुलं उघड्यावर पडली. तिला कठोर शिक्षा झाली पाहिजे. जोपर्यंत तिच्यावर गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत माझ्यावर अंत्यसंस्कार करू नका, असे ही सुसाईड नोट आढळून आले. त्याच्या पश्चात आई -वडील, पत्नी, मुलगी व मुलगा असा परिवार आहे. शुक्रवारी रात्री कैलास नगर येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी