शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

साखरेची चव झाली कडू

By admin | Updated: May 19, 2014 00:18 IST

किनवट : तालुक्यातील १९८ स्वस्त धान्य दुकानातून गेल्या पाच महिन्यांपासून स्वस्त दरात मिळणारी साखर मिळालीच नसल्याने

किनवट : तालुक्यातील १९८ स्वस्त धान्य दुकानातून गेल्या पाच महिन्यांपासून स्वस्त दरात मिळणारी साखर मिळालीच नसल्याने २७ हजार ९ शिधापत्रिका धारकांना खुल्या बाजारातून महागडी साखर विकत घ्यावी लागत आहे़ त्यामुळे गोरगरीब आदिवासींना गोड साखर कडू लागत आहे़ १४ रुपये प्रतिकिलो दराने मिळणारी साखर स्वस्त धान्य दुकानात जानेवारी २०१४ पासून आलीच नाही़ परिणामी ३४ रुपये प्रतिकिलो दराने खुल्या बाजारातून विकत घ्यावी लागत आहे़ जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी किनवट या आदिवासी तालुक्यात १९८ स्वस्त धान्य दुकाने कार्यान्वित असून बीपीएल योजनेचे १२ हजार ३ व अंत्योदय योजनेच १५ हजार ६ कार्डधारक आहेत़ तसेच ११ हजाराच्या वर एपीएलचे कार्डधारक आहेत़ बीपीएल व अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका धारकांना प्रतिकार्ड दोन किलो साखर दिली जाते़ खरे तर एका कुटुंबाला महिन्याकाठी चार-पाच किलो साखर लागते़ पण स्वस्त धान्य दुकानातून केवळ दोन किलो साखर देवून बोळवण केली जाते़ त्यातही पाच महिन्यापासून म्हणजे जानेवारी २०१४ पासून स्वस्त दराची साखर आलीच नाही़ गेल्या काही वर्षापासून स्वस्त धान्य दुकानातून धरसोड पद्धतीने साखरेचे वाटप होत असल्याने स्वस्त दरात साखर देण्याची शासनाची इच्छा नसावी काय, म्हणून की काय गोरगरीबांना खुल्या बाजारातून साखर खरेदी करावी लागत असल्याने ती गोड न लागता कडूच लागत आहे़ याबाबत तहसीलचे पुरवठा अधिकारी म़ अजीमोद्दीन यांना विचारले असता प्रत्येक बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांच्या निदर्शनास ही बाब आणून चर्चा होत आहे़ शासनाकडूनच साखरेचा पुरवठा नसल्याने स्वस्त धान्य दुकानातून साखरेचे वाटप जानेवारीपासून नसल्याचे म़अजीमोद्दीन यांनी सांगितले़ (वार्ताहर) असा बसतो खिशाला फटका दर महिन्याला २७ हजार ९ शिधापत्रिका धारकांसाठी ५४० क्विंटल साखर येते़ त्या साखरेची विक्री प्रतिकिलो १४ रुपये दराने करण्याचे स्वस्त धान्य दुकानदारांना निर्देश आहेत़ पाच महिन्यापासून स्वस्त दराची साखर मिळतच नसल्याने प्रतिकिलो २० रुपये जास्तीची रक्कम देवून गोरगरीब शिधापत्रिका धारकांना खुल्या बाजारातून मिळवावी लागत असल्याने गोरगरिबांच्या खिशाला जणू फटकाच बसत आहे़