शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

वाळू पट्ट्यांची अचानक तपासणी

By admin | Updated: May 8, 2014 00:12 IST

उस्मानाबाद : जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी बुधवारी परंडा तालुक्यातील चार वाळूपट्ट्यांना अचानक भेट देऊन तपासणी केली.

उस्मानाबाद : जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी बुधवारी परंडा तालुक्यातील चार वाळूपट्ट्यांना अचानक भेट देऊन तपासणी केली. वाळू उपसा करताना अनेक ठिकाणी सर्रास नियम धाब्यावर बसविले जात असल्याचे यावेळी दिसून आले. विशेष म्हणजे परवानगी नसतानाही काही ठिकाणी वाळू उपशासाठी सक्षम पंपाचा वापर होत असल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर याप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी भूजल सर्वेक्षण विभागाकडून अहवाल मागविला आहे. परंडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूपट्टे आहेत. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी गुरूवारी सकाळी ६ ते ९.३० या वेळेत तालुक्यातील कौडगाव, बंगाळवाडी, शिराळा आणि वागेगव्हाण येथील वाळू पट्ट््यांना अचानक भेट देवून तपासणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत भूमचे उपविभागीय अधिकारी संतोष राऊत, परंडा तहसीलदार शिवकुमार स्वामी, मंडळ अधिकारी देवकते यांच्यासह अधिकारी, कर्मचार्‍यांचा समावेश होता. या पथकाने सकाळी सहा वाजल्यापासून प्रत्यक्ष वाळू पट्टे तपासणीला सुरूवात केली असता, काही ठेकेदारांकडून वाळूचा उपसा करताना अनेक नियम डावलले जात असल्याचे समोर आले. वाळूचा उपसा करण्यासाठी सक्षम पंपाचा वापर करण्यास परवानगी नसतानाही त्याचा वापर होताना दिसून आले. सक्षम पंपाव्दारे वाळू उपसा केल्यास पाण्याखालील वाळूचा उपसा होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळेच ही बाब या पथकाने गांभिर्याने घेतली. दरम्यान, याबाबत उपविभागीय अधिकारी संतोष राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, सदर प्रकरणी भूजल सर्वेक्षण विभागाकडून अहवाल मागविण्यात आला आहे. हा अहवाल प्राप्त होताच संबंधितांविरूद्ध नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)