शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

केंद्र संचालकासह शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 11:31 PM

सरस्वती भुवन शिक्षणसंस्थेच्या सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथील स.भु. हायस्कूलमध्ये दहावीच्या गणित विषयात झालेल्या सामूहिक कॉपी प्रकरणात सहभागी केंद्र संचालकासह तीन शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जारी केले आहेत. दोषी विद्यार्थ्यांवर चालू वर्षाची संपादणूक रद्द करीत आगामी तीन वर्षांसाठी परीक्षा देण्यास बंदी घालण्यात आली. या कारवाईची अंमलबजावणी करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांसह स.भु. संस्थेला पत्र दिल्याची माहिती मंडाळाच्या सचिव सुगाता पुन्ने यांनी दिली.

ठळक मुद्देगोंदेगाव सामूहिक कॉपी प्रकरण : शिक्षण मंडळाचे शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश; शिक्षकांवर कारवाईसाठी स.भु. संस्थेला पत्र

औरंगाबाद : सरस्वती भुवन शिक्षणसंस्थेच्या सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथील स.भु. हायस्कूलमध्ये दहावीच्या गणित विषयात झालेल्या सामूहिक कॉपी प्रकरणात सहभागी केंद्र संचालकासह तीन शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जारी केले आहेत. दोषी विद्यार्थ्यांवर चालू वर्षाची संपादणूक रद्द करीत आगामी तीन वर्षांसाठी परीक्षा देण्यास बंदी घालण्यात आली. या कारवाईची अंमलबजावणी करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांसह स.भु. संस्थेला पत्र दिल्याची माहिती मंडाळाच्या सचिव सुगाता पुन्ने यांनी दिली.दहावीच्या परीक्षेतील गोदेंगाव येथील स. भु. हायस्कूलमधील परीक्षा केंद्रात ३२२ विद्यार्थी ११ मार्च रोजी गणित विषयाची परीक्षा देत होते. या परीक्षेत केंद्र संचालक बी. एन. कोठावदे, गणित विषयाचे शिक्षक प्रदीप महालपुरे व संदीप महालपुरे यांनी संगनमत करून बीजगणिताच्या परीक्षेत कर्तव्यात कसूर करीत गैरव्यवहार केला. यामुळे या शिक्षकांवर महाराष्ट्र प्रिव्हेन्शन आॅफ माल प्रॅक्टिसेस अ‍ॅक्ट युनिव्हर्सिटी बोर्ड अ‍ॅण्ड आॅदर स्पेसिसाइट्स एक्झामिनेशन अ‍ॅक्ट १९८२ मधील कलम ७ नुसार फौजदारी गुन्हे दाखल करीत तात्काळ कारवाईचा अहवाल मंडळाला कळविण्यात यावा, असे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना दिले आहेत. याशिवाय ३२२ विद्यार्थ्यांवर चालू वर्षाचा निकाल रद्द करीत (वन प्लस टू ) आगामी तीन वर्षांत परीक्षा देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच सरस्वती भुवन शिक्षणसंस्थेच्या व्यवस्थापनाला पत्र पाठवत इतर सहभागी व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे पत्रही शनिवारी पाठविण्यात आले आहे. मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच सामूहिक कॉपीप्रकरणी कडक कारवाई करण्यात आली आहे.काय होती घटना?गोंदेगाव येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांच्या भरारी पथकाने ११ मार्च रोजी भेट दिली. तेव्हा या केंद्रावर शिक्षकांच्या सहकार्यानेच सामूहिक कॉपी करण्यात येत असल्याचे आढळून आले. कार्बनच्या मदतीने एकाच हस्ताक्षरातील कॉपी समोर आली. यात शंभरपेक्षा जास्त झेरॉक्स प्रती जप्त केल्या. या घटनेचा अहवाल मंडळाला दिल्यानंतर केंद्र संचालक बदलण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका मंडळात मागविल्या. तसेच चौकशीसाठी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीने दिलेल्या अहवालानंतर विभागीय शिक्षण मंडळाच्या तदर्थ समितीसमोर हे प्रकरण ठेवण्यात आले होते. यात विविध मुद्यांवर चर्चा झाल्यानंतर १४ ते १६ जूनदरम्यान परीक्षार्थींनाही बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. यानंतर शनिवारी कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षणexamपरीक्षा