शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

मराठवाड्यातील आरोग्य, शिक्षण, कुपोषणावर होणार अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 6:57 PM

मराठवाड्यातील आरोग्य, आदिवासी मुलींचे उच्चशिक्षण, मुलींचे शिक्षण, नर्सिंग प्रशिक्षण, महिलांचे आरोग्य, कुपोषण या विषयांवर विविध तज्ज्ञ मंडळी अभ्यास करणार

ठळक मुद्देमराठवाडा विकास मंडळाच्या बैठकीत निर्णय

औरंगाबाद : मराठवाड्यातील आरोग्य, आदिवासी मुलींचे उच्चशिक्षण, मुलींचे शिक्षण, नर्सिंग प्रशिक्षण, महिलांचेआरोग्य, कुपोषण या विषयांवर विविध तज्ज्ञ मंडळी अभ्यास करणार असल्याची माहिती मंडळाचे तज्ज्ञ सदस्य डॉ. अशोक बेलखोडे यांनी दिली.

मराठवाडा विकास मंडळामध्ये समाजकल्याण, महिला बालकल्याण आणि आदिवासी विकास तसेच आरोग्य समितीच्या बैठकीत बेलखोडे बोलत होते. यावेळी मंडळाचे सदस्य सचिव डी. एम. मुगळीकर, घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर, शासकीय दंत महाविद्यालयचे डॉ.शिरीष खेडगीकर, स्त्रीरोग प्रसूती विभागाचे प्रमुख डॉ.श्रीनिवास गडप्पा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसरा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे वाल्मीक सरवदे, मराठवाड्यातील आरोग्य, महिला व बालविकास, समाजकल्याण विभागचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मराठवाड्यात आदिवासींच्या मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण ४८ टक्के  आहे. त्यांच्या शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी खिंवसरा, अरुंधती पाटील, सविता शेट्ये यांच्या पुढाकाराने अभ्यास समिती नेमण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणावरही अभ्यास करण्यात येणार आहे. भटक्या विमुक्तांच्या पुनर्वसनासाठी राम राठोड यांच्या पुढाकारातून समिती अभ्यास करणार आहे. तर आदिवासी शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांचा आढावा घेऊन सविस्तर अभ्यास प्राचार्य सुभाष टकले करणार आहेत. किनवट येथे आदिवासी भागातील मुलींसाठी नर्सिंग स्कूल व्हावे यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचेही बेलखोडे यांनी सांगितले.  मराठवाड्यातील नर्सिंग प्रशिक्षण केंद्राबाबतचा अभ्यास अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ.अंकुशे करणार आहेत. 

कुपोषण निर्मूलनासाठी कार्यशाळा मराठवाड्यातील महिलांच्या आरोग्यावरील अभ्यास होणे महत्त्वाचे असून, यासाठी औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. येळीकर आणि डॉ.क्रांती रायमाने अभ्यास करणार आहेत. ग्रामीण भागात वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता वाढावी यासाठी डॉ.मोगरेकर काम करणार आहेत. तर मराठवाड्यातील कुपोषणाच्या संदर्भात येथील विद्यापीठाबरोबरच गृहविज्ञानशास्त्र महाविद्यालयांमध्ये कार्यशाळेचे आयोजनदेखील करण्यात येणार असल्याचे बेलखोडे यांनी सांगितले.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाHealthआरोग्यEducationशिक्षणWomenमहिला