नव्या क्षितिजाच्या शोधात विद्यार्थी लातुरात़़!

By Admin | Updated: June 19, 2014 00:19 IST2014-06-19T00:06:22+5:302014-06-19T00:19:32+5:30

लातूर : ध्येयाच्या दिशेने निघालेल्या विद्यार्थीमित्रांनी आताशी कुठे एक ‘माईलस्टोन’ गाठले आहे़

Students search for a new horizon! | नव्या क्षितिजाच्या शोधात विद्यार्थी लातुरात़़!

नव्या क्षितिजाच्या शोधात विद्यार्थी लातुरात़़!

लातूर : ध्येयाच्या दिशेने निघालेल्या विद्यार्थीमित्रांनी आताशी कुठे एक ‘माईलस्टोन’ गाठले आहे़ दहावीच्या निकालात उत्तुंग भरारी घेऊन ते आता क्षितिजाच्या दिशेने झेपावण्यास सज्ज झाले आहेत़ निकालानंतर आता विद्यार्थ्यांसह पालकांचीही पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी लगबग सुरु झाली आहे़ दहावीनंतर साधारणत: अकरावीलाच प्रवेश घेण्याचा अनेकांचा कल असतो़ आयटीआय, तंत्रनिकेतन, कृषी तंत्र पदविका हे पर्यायही विद्यार्थ्यांसमोर खुले आहेत़ बारावी परीक्षेच्या ‘लातूर पॅटर्न’चा गवगवा राज्यभरात झालेला आहे़ त्यामुळे निकालाच्या दुसऱ्याच दिवसापासून लातुरात प्रवेशासाठी राज्यभरातील विद्यार्थी-पालकांची गर्दी झाली़ राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय तसेच अहमदपुरातील महात्मा गांधी महाविद्यालयात अकरावीचा प्रवेश अर्ज खरेदी करण्यासाठी रांगा लागल्या होत्या़ सांगली, सातारा, बुलढाणा, मुंबई, पुणे, सोलापूर, बीड, परभणी, उस्मानाबाद, औरंगाबाद, यवतमाळ अशा दूरदूरच्या जिल्ह्यातून पालक विद्यार्थ्यांसमवेत स्वत: हजर झाले होते़ जिल्ह्यात अकरावीच्या ४१,५६० जागा उपलब्ध आहेत़ त्यापैकी १६,६०० जागा विज्ञान शाखेच्या आहेत़ कला शाखेच्या १८,९२० तर वाणिज्य शाखेच्या ३२८० जागा प्रवेशक्षम आहेत़
विज्ञानसाठी गांधी, शाहू, दयानंदमध्ये गर्दी
‘लातूर पॅटर्न’मुळे लातुरातील राजर्षी शाहू महाविद्यालयात विज्ञान शाखेला प्रवेश घेण्यासाठी मोठी गर्दी होते़ बुधवारी पहिल्याच दिवशी जवळपास २ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून २९०० अर्ज विक्रीस गेले़ येथे ४८० अनुदानित तर २४० विनाअनुदानित जागा आहेत़ २१ जूनपर्यंत नोंदणी होणार असून, २३ जून रोजी चेकलिस्ट लागेल़ २४ जूनला पहिली निवड यादी जाहीर होईल़ या यादीतील प्रवेश २४ व २५ रोजी होतील़ २६ ला दुसरी यादी व प्रवेश २६, २७ रोजी होतील़ २८ ला अंतिम निवड यादी जाहीर होईल़
दयानंद महाविद्यालय
बारावी परीक्षेत दयानंद विज्ञान महाविद्यालयानेही आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे़ येथेही बुधवारी प्रवेश नोंदणीसाठी रांगा लागल्या होत्या़ दिवसभरात १४४० विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली असून जवळपास ३ हजार अर्जांची विक्री झाली आहे़ महाविद्यालयात अनुदानित ७२० व विनाअनुदानित ७२० जागा आहेत़ २८ जूनपर्यंत नोंदणी चालणार आहे़ २९ जून रोजी चेकलिस्ट लागणार आहे़ ३० जून रोजी पहिली प्रवेश यादी जाहीर होईल़ ३ व ४ जुलै रोजी अनुक्रमे दुसरी व तिसरी प्रवेश यादी जाहीर करण्यात येणार आहे़
महात्मा गांधी महाविद्यालय
बारावीच्या निकालात अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयाने आपला दबदबा राखला आहे़ बुधवारपासून प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून येथे ७२० जागा उपलब्ध आहेत़ २८ जूनपर्यंत नोंदणी होईल़ ३० जून रोजी निवड यादी लागणार असून १ ते ३ जुलै रोजी प्रवेश होतील़ ४ जुलै रोजी पहिली प्रतीक्षा यादी लागणार असून त्याचे प्रवेश ५ ते ७ जुलै रोजी होतील़ दुसरी प्रतिक्षा यादी ८ जुलै रोजी लागून ९ व १० जुलै रोजी प्रवेश प्रक्रिया चालेल़ अपंग, आजी-माजी सैनिक, खेळाडू, स्वातंत्र्यसैनिक, बदली प्रवर्गातील प्रवेश १२ जुलै रोजी होणार आहेत़
इतरही 8000 पर्याय़़़
अकरावीचा आॅप्शन ड्रॉप करणाऱ्या अनेकांची पसंती तंत्रनिकेतनला आहे़ जिल्ह्यात जवळपास १७ तंत्रनिकेतन महाविद्यालये असून त्यात ५४०० जागा उपलब्ध आहेत़ प्रवेश प्रक्रिया आठवडाभरात सुरु होण्याची शक्यता़
दहावीनंतर आयटीआय करु इच्छिणाऱ्यांसाठी ३५ ट्रेड असून २३०० जागा उपलब्ध आहेत़ प्रत्येक तालुक्यास शासकीय आयटीआयची सोय आहे़ सोमवारपासून प्रवेश प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे़
कृषी तंत्र पदविकेचीही संधी दहावीनंतर उपलब्ध आहे़ जिल्ह्यात १ शासकीय व ७ खाजगी विद्यालये आहेत़ त्यातून ४८० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकेल़ प्रवेश प्रक्रिया २५ जूनपासून प्रवेश प्रक्रियेस आॅनलाईन प्रारंभ़
आयटीआयप्रमाणेच तंत्र प्रशालेत इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, आॅटो इंजिनिअरिंग टेक्नोलॉजी असे ३ स्वतंत्र ट्रेड आहेत़ या ट्रेडच्या प्रत्येकी २० प्रमाणे केवळ ६० जागा आहेत़ प्रवेश प्रक्रिया २६ जूनपासून सुरु होतेय़्
दहावीनंतर एचएससी व्होकेशनलचाही (एमसीव्हीसी) पर्याय आहे़ जिल्ह्यात ६० महाविद्यालयांतून ४०४० जागा उपलब्ध आहेत़ प्रवेश थेट जागेवरच देण्याची प्रक्रिया निकालानंतर लगेच सुरु झाली आहे़
प्रवेश प्रक्रियेत आरक्षण़़़
अकरावीसाठी स्वजिल्हा 70 टक्के; परजिल्हा ३० टक्के
अनुसूचित जमाती 07%
विशेष मागासवर्गीय 02%
विमुक्त जाती (अ) 03%
भटक्या जमाती1 (ब) 2.5%
भटक्या जमाती2 (क) 3.5%
भटक्या जमाती3 (ड) 02%

Web Title: Students search for a new horizon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.