शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना आता व्यावसायिक शिक्षणाचे धडे!

By admin | Updated: May 25, 2014 01:31 IST

औरंगाबाद : काही वर्षांपूर्वी संस्कारक्षम पिढी घडविण्यावर शिक्षकांचा अधिक भर असायचा. आज विद्यार्थ्यांवर नुसते संस्कार करून उपयोग नाही

औरंगाबाद : काही वर्षांपूर्वी संस्कारक्षम पिढी घडविण्यावर शिक्षकांचा अधिक भर असायचा. आज विद्यार्थ्यांवर नुसते संस्कार करून उपयोग नाही, तर त्यांना किमान कौशल्य, आधुनिक तंत्रज्ञानही अवगत झाले पाहिजे, या दृष्टिकोनातून शिक्षण विभाग शालेय अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करीत आहे. इयत्ता तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांना आता व्यावसायिक शिक्षणही देण्यात येणार आहे. प्राथमिक शिक्षण गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार असावे यासाठी शिक्षण विभागातर्फे वारंवार अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहेत. या बदलामुळे अवघ्या सात-आठ वर्षे वयाच्या मुलांना शाळेत नवीन अभ्यासक्रमानुसार व्यावसायिक शिक्षणाचे धडे गिरविता येतील. पाठ्यपुस्तकातील मोठमोठे धडे वाचून प्रश्नांची उत्तरे पाठ करण्यापेक्षा विद्यार्थ्यांची आकलन क्षमता लक्षात घेऊन सहज लक्षात राहील अशा गोष्टींवर नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आल्याची माहिती पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक चंद्रमणी बोरकर यांनी दिली. अभ्यासक्रमात करण्यात आलेले बदल मुलांचे भवितव्य घडविण्याच्या दृष्टिकोनातून योग्यच आहेत. सध्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागते. या परीक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांच्या मनावर येणारे दडपण कमी होईल. शालेय जीवनातच त्यांचा पाया मजबूत झाल्यास ही पिढी भविष्यात कोणत्याही स्पर्धा परीक्षांना सहजपणे तोंड देऊ शकेल, असे मत पाठ्यपुस्तक मंडळाचे व्यवस्थापक भागवत पुरी यांनी व्यक्त केले.पुढील वर्षाच्या नवीन शैक्षणिक वर्षात म्हणजे २०१५-१६ मध्ये पाचवीचा अभ्यासक्रम बदलला जाणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच हा अभ्यासक्रम बदलण्यात येणार होता, काही तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. भविष्यात चांगले आणि सर्वगुणसंपन्न विद्यार्थी शालेय जीवनापासून तयार व्हावेत या दृष्टीने शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले. भविष्यात आणखी नवीन प्रयोग अभ्यासक्रमात दिसून येतील यादृष्टीने शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.