शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

बससेवा नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल

By admin | Updated: July 19, 2014 00:46 IST

आंबा चोंढी : वसमत - पांगरा शिंदे या मार्गावरील बससेवा बंद असल्याने शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून ही बससेवा पूर्वीप्रमाणे सुरू करावी

आंबा चोंढी : वसमत - पांगरा शिंदे या मार्गावरील बससेवा बंद असल्याने शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून ही बससेवा पूर्वीप्रमाणे सुरू करावी, अशी मागणी पालकांमधून करण्यात येत आहे. आंबा चोंढी रेल्वे स्टेशन येथे पहिली - बारावीपर्यंत शिक्षणासाठी शाळा, महाविद्यालयाची सुविधा उपलब्ध असल्याने परिसरातील अनेक खेडेगावातून मुले-मुली शिकण्यासाठी त्या ठिकाणी येतात. या ठिकाणी जवळपास २ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. मरसूळ, मरसुळवाडी, चोंढी तांडा येथील अनेक कुटुंब दारिद्र्य रेषेखालील व आदिवासी समाजाचे आहेत. त्यांना गोरखनाथ विद्यालय ही एकमेव बारावीपर्यंत शाळा आहे. वाई, आंबा, कोर्टा, पांगरा बोखारे, मरसुळ, मरसूळवाडी, चोंढी बहेरोबा येथील ग्रामपंचायतींनी वसमत- पांगरा शिंदे बससेवा सुरू करण्याबाबतच्या मागणीचा ठराव घेतला आहे. या ठरावाची प्रत वसमतच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आली. दररोज सकाळी सकाळी ७ वाजता व संध्याकाळी ५ वाजता वसमत- पांगरा शिंदे ही बससेवा सुरू ठेवावी, अशी मागणीही परभणीच्या विभाग नियंत्रकांकडे करण्यात आली आहे. त्यावर ही बससेवा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते; परंतु अद्याप सेवा सुरू झालेली नाही. या मार्गावरील आपआपल्या गावातून ये-जा करण्यासाठी या विद्यार्थ्यांना बससेवा उपलब्ध नसल्याने खाजगी जीप, आॅटोरिक्षा, मिनी व्हॅन मधून प्रवास करावा लागतो. अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचे बससेवा नसल्याने फावत आहे.विशेष म्हणजे वसमतचे आ. जयप्रकाश दांडेगावकर यांनी शालेय विद्यार्थिनींसाठी विशेष बाब म्हणून वसमत - पांगरा शिंदे ही बससेवा सुरू करण्याबाबत राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी विभागाच्या नियंत्रकांना पत्र दिले आहे. (वार्ताहर)भागीय नियंत्रकांना पत्रवसमत तालुक्यातील आंबा चोंढी रेल्वेस्टेशन येथे पहिली ते बारावीपर्यंत शिक्षणासाठी शाळा, महाविद्यालयाची सुविधा उपलब्ध असून परिसरातील अनेक खेडेगावातील जवळपास २ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात.वसमत-पांगरा शिंदे मार्गावरील बससेवा बंद पडल्याने शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. वाई, आंबा, कोर्टा, पांगरा बोखारे, मरसुळ, मरसूळवाडी, चोंढी बहेरोबा येथील ग्रामपंचायतींनी वसमत- पांगरा शिंदे बससेवा सुरू करण्याबाबतच्या मागणीचा ठराव घेतला आहे.या ठरावाची प्रत वसमतच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आली.दररोज सकाळी सकाळी ७ वाजता व संध्याकाळी ५ वाजता वसमत- पांगरा शिंदे ही बससेवा सुरू ठेवावी, अशी मागणीही परभणीच्या विभाग नियंत्रकांकडे करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणून वसमत- पांगरा बससेवा सुरू करण्याबाबत आ.जयप्रकाश दांडेगावकर यांनी विभागीय नियंत्रकांना पत्र दिले.