शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

तांडा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची नावे झळकणार मंगळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 12:58 IST

शिक्षकांनी विद्यार्थ्यांची 'नासा'कडे केली ऑनलाईन नोंदणी

ठळक मुद्दे‘नासा’चे ‘मंगळ रोव्हर २०२०’ हे अंतरिक्ष यान मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे.आतापर्यंत जगभरातून ७५ लाखांपेक्षा अधिक लोकांनी यासाठी आपली नावे नोंदविली आहेत. ‘आयएसओ’ मानांकनप्राप्त आहे शाळा

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील तांडा बु. येथील जि.प. शाळेच्या मुलांची नावे नासाच्या अवकाश यानातून मंगळ ग्रहावर झळकणार आहेत. त्यासाठी शाळेतील उपक्रमशील शिक्षकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. 

या उपक्रमात शाळेचे उपक्रमशील शिक्षक पांडुरंग गोर्डे, महेश मगर आणि प्रल्हाद धायतडक यांनी परिश्रम घेतले आहेत. ‘नासा’ या जगविख्यात अवकाश संशोधन संस्थेचे ‘मंगळ रोव्हर २०२०’ हे अंतरिक्ष यान मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे. या अंतरिक्ष यानाबरोबर स्टेनसील्ड चीपवर आपली नावे पाठवून दुसऱ्या ग्रहावर आपल्या पाऊलखुणा सोडण्याची ऐतिहासिक संधी नासाच्या वतीने जगभरातील सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून दिली आहे. नासाच्या पसाडेना, कॅलिफोर्निया येथील जेट प्रोपुलशन लॅबोरेटरीतील मायक्रोडिव्हायसेस लॅबोरेटरीमध्ये इलेक्ट्रॉनिक बीमचा वापर करून सिलिकॉनच्या चीपवर मानवी केसाच्या एक हजाराव्या भागाएवढ्या रुंदीत नोंदवलेली नावे स्टेन्सिल केली जाणार आहेत. एक डेमी आकाराच्या चीपवर दहा लाख नावे मावतील. याअंतर्गत तांडा बु. येथील जि.प. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची, तसेच शिक्षक व शाळेचीही नावे या उपक्रमासाठी नोंदवली आहेत. त्यासाठी आलेल्या बोर्डिंग पासचे वाटप शाळेत करण्यात आले. 

आतापर्यंत जगभरातून ७५ लाखांपेक्षा अधिक लोकांनी यासाठी आपली नावे नोंदविली आहेत. तुर्की देशातून २४ लाखांपेक्षा जास्त नोंदणी झाली आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर भारत देश आहे. भारतातून ८ लाखांपेक्षा जास्त लोकांनी आपली नावे नोंदविली आहेत. हे यान अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील कॅप कानावेराल येथील सैन्य दलाच्या तळावरून १७ जुलै २०२० ते ५ आॅगस्ट २०२० दरम्यान लाँच केले जाणार आहे. ते २०२१ च्या फेब्रुवारी महिन्यात मंगळावर पोहोचण्याची शक्यता आहे.

‘आयएसओ’ मानांकनप्राप्त शाळा; शिक्षकांनी केली ऑनलाईन नोंदणी  तांडा बु. येथील जि.प. शाळा ही ‘आएसओ’ मानांकनप्राप्त आहे. पहिली ते पाचवीपर्यंतच्या या शाळेत ७९ विद्यार्थी असून, ३ शिक्षक कार्यरत आहेत. शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी सतत परिश्रम घेत आहेत. मंगळावर नावनोंदणीची कल्पना नाशिक येथील शिक्षक मित्राकडून समजली. त्याने ऑनलाईन नोंदणीसाठी ‘लिंक’ही पाठविली होती. त्यानुसार आम्ही शाळा, शिक्षक आणि संपूर्ण विद्यार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी केली. नावनोंदणी यशस्वी झाल्याची पोचही आम्हाला प्राप्त झाली आहे. यंदा या शाळेतील ४० विद्यार्थी शासकीय विद्यानिकेतनसाठी पात्र झाले असून, १० विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. आम्ही शाळेत दरवर्षी उपक्रमशील प्रयोग राबवीत असतो, असे मुख्याध्यापक पांडुरंग गोर्डे यांनी सांगितले.

टॅग्स :Studentविद्यार्थीzp schoolजिल्हा परिषद शाळाAurangabadऔरंगाबादNASAनासाMarsमंगळ ग्रह