शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

वशिलेबाजीत अडकले ‘बीजभांडवल’

By admin | Updated: November 17, 2015 00:34 IST

औरंगाबाद : जिल्हा उद्योग केंद्रातर्फे राबविल्या जाणाऱ्या सुधारित बीजभांडवल योजनेच्या लाभार्थी निवडीच्या याद्या अखेर सोमवारी (दि.१६) जाहीर करण्यात आल्या

औरंगाबाद : जिल्हा उद्योग केंद्रातर्फे राबविल्या जाणाऱ्या सुधारित बीजभांडवल योजनेच्या लाभार्थी निवडीच्या याद्या अखेर सोमवारी (दि.१६) जाहीर करण्यात आल्या. लाभार्थ्यांची निवड करताना आर्थिक उलाढाल झाल्याचा आरोप बेरोजगारांनी केला आहे. पुढाऱ्यांच्या शिफारशींना लाभार्थी निवडीत झुकते माप दिल्याचा आरोपही काही जणांनी केला. यादीत आपले नाव नसल्याचे बघून काहींना रडू आवरणे कठीण झाले होते.बीजभांडवल योजनेंतर्गत स्वत:चा उद्योग सुरू करण्यासाठी बेरोजगारांना २५ लाख रुपयांपर्यंतचे अर्थसाह्य कर्जाच्या रुपात मिळवून दिले जाते. निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी बँकांना सादर केली जाते. या योजनेसाठी खुल्या प्रवर्गातील ६७, तर मागास प्रवर्गातील १६७ लाभार्थ्यांची निवड करण्याचे उद्दिष्ट उद्योग केंद्राला देण्यात आले होते. खुल्या प्रवर्गातील १,५२५, तर मागास प्रवर्गातील १,३१३ जणांनी अर्ज केले होते. आपल्याच मर्जीतील लाभार्थ्यांची निवड करावी, यासाठी मंत्री, खासदार, आमदार आदी लोकप्रतिनिधींनी शिफारशी केल्या होत्या. लाभार्थी निवडीसाठी मुलाखतीही घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर अखेर लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली.अपेक्षाभंग झालाबीजभांडवल योजनेसाठी मी गेल्या चार वर्षांपासून अर्ज करीत आहे. मसाले, चिप्सच्या घरगुती उद्योगाच्या विस्तारासाठी यंदा अर्ज केला होता. मुलाखतही चांगली झाली होती. मुलाखतकर्त्यांनी तयार करण्यास सांगितलेले पदार्थ मी तातडीने केले होते. ‘तुमची निवड होईल,’ असा विश्वासही त्यांनी दिला होता; परंतु यादीत नाव नसल्याने अपेक्षाभंग झाला आहे. उद्योगासाठी कर्ज घेण्यास गेल्यास बँका तारण मागतात. तारण ठेवण्यासारखे काही नसल्याने बीजभांडवल योजनेसाठी अर्ज केला होता. गुणवत्तेच्या आधारावर निवडीची खात्री होती; परंतु यादीवर नजर टाकल्यानंतर लाभार्थी निवडीत नक्कीच घोटाळा झाल्याचे वाटते, असे मंजूषा कुलकर्णी यांनी सांगितले.अधिकाऱ्यांवर सरबत्तीयादी बघून संतप्त झालेल्या काही बेरोजगारांनी उद्योग केंद्राचे व्यवस्थापक जी. बी. जोशी यांची भेट घेतली. आपली निवड न झाल्याबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त करून त्यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. बेरोजगारांची समजूत घालण्याचा जोशी यांनी प्रयत्न केला.पारदर्शी निवडबीजभांडवल योजनेसाठी उद्दिष्टाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात अर्ज आले होते.लाभार्थ्यांची निवड अत्यंत पारदर्शकपणे केली. राजकीय दबाव व आर्थिक कारणांमुळे निवड झाल्याच्या आरोपात कसलेही तथ्य नसल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक जी. बी. जोशी यांनी सांगितले.