शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
4
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
5
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
6
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
7
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
8
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
9
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
10
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
11
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
12
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
13
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
14
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
15
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
16
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
17
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
18
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
19
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
Daily Top 2Weekly Top 5

नामांकित कंपनीच्या बियाणांसाठी धडपड

By admin | Updated: May 27, 2014 01:01 IST

पालम : तालुक्यातील शेतकर्‍यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपली आहेत़ पेरणीच्या तोंडावर नामांकित बियाणांची खरेदी सुरू झालेली आहे़

पालम : तालुक्यातील शेतकर्‍यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपली आहेत़ पेरणीच्या तोंडावर नामांकित बियाणांची खरेदी सुरू झालेली आहे़ शेतात पेरण्यासाठी नामांकीत बियाणे मिळावे, यासाठी शेतकर्‍यांनी धडपड सुरू केली आहे़ मे महिन्याच्या शेवटी शेतकर्‍यांनी शेतातील नांगरट, पाळी यासह विविध कामे आटोपली आहेत़ बागायतदार शेतकरी मे महिन्याच्या शेवटी कापसाची लागवड करीत असतात़ यासाठी चांगल्या कंपनीची उत्पादन देणारे बियाणे निवडले जातात़ कापूस लागवडीसाठी शेतकर्‍यांनी कापसाच्या बियाणांच्या खरेदीवर उडी मारलेली आहे़ बाजारपेठेत विविध कंपन्यांच्या बियाणांची दुकानदारांकडे विचारणा केली जात आहे़ नामांकित कंपन्यांचे बियाणे मिळावे, यासाठी शेतकरी आग्रह धरीत आहेत़ त्यामुळे बियाणांची टंचाई निर्माण झाल्याने भाव वधारले आहेत़ सोयाबीन बियाणाची टंचाई निर्माण होण्याची भीती निर्माण झाल्याने आतापासून सोयाबीन बियाणाची खरेदी करण्यावर भर दिला जात आहे़ पुढील काळात बियाणे, रासायनिक खतांची टंचाई निर्माण होण्याच्या भीतीने शेतकर्‍यांनी आतापासून बियाणे खरेदीची लगबग सुरू केली आहे़ नामांकित कंपनीचे बियाणे मिळावेत यासाठी बाजारपेठेत शोध घेतला जात आहे़ पालम शहरात बियाणे न मिळाल्यास गंगाखेड, परभणी, लोहा, नांदेड या ठिकाणी शेतकरी बियाणांची खरेदी करीत आहेत़ (प्रतिनिधी)पेरणीसाठी शेतकरी बियाणे खरेदीत व्यस्त आहेत़ नामांकीत कंपनीच्या बियाणांची खरेदी करताना बाजारपेठेत फिरून किमतीची चौकशी केली जात आहे़ ज्या दुकानावर बियाणांची किंमत कमी असेल अशा दुकानावरून शेतकरी बियाणांची खरेदी करीत आहेत़ बियाणांच्या किमतीची चौकशी करूनही खरेदी करण्यावर शेतकर्‍यांनी भर दिला आहे़ पेरणीच्या तोंडावर शेतकर्‍यांनी बियाणांची खरेदी सुरू केली आहे़ यावर ते शेतकर्‍यांना बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करीत आहे़ नामांकित कंपनीच्या प्रमुखांना भेटून बियाणे शक्य तेवढे जास्त उपलब्ध करून देण्यात येत आहे़ शेतकर्‍यांना बियाणे विक्री करताना काळा बाजार करण्याचा प्रयत्न केल्यास दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जि़प़ सभापती गणेशराव रोकडे यांनी दिला़