शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

पोळ्याच्या दिवशी दोन ठिकाणी हाणामाऱ्या

By admin | Updated: August 26, 2014 23:54 IST

सेलू: पोळा सणाच्या दिवशी तालुक्यातील कवडधन व साळेगाव या ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या.

सेलू: पोळा सणाच्या दिवशी तालुक्यातील कवडधन व साळेगाव या ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या. कवडधन येथे पोळा सणाची मिरवणूक झाल्यानंतर बँड का वाजवत नाहीस, या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करून चाकू हल्ला केला़ या प्रकरणी रतन केशव थोरात यांच्या तक्रारीवरून राजेभाऊ काकडे, मुंजाभाऊ काकडे, सुधाकर काकडे यांच्या विरूध्द मारहाण व दुखापत करून शिवीगाळ केल्या प्रकरणी अ‍ॅट्रसिटीचा गुन्हा सेलू पोलिसात दाखल झाला आहे़ तसेच साळेगाव येथे दोन गटात फ्रिस्टाईल हाणामाऱ्या झाल्या असून परस्पर विरोधी तक्रारी सेलू पोलिसात देण्यात आल्या आहेत़ दिलीप जीवनराव आकात यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २५ आॅगस्ट रोजी रात्री घरात घुसून, तुम्ही आमच्या विरूध्द तहसीलमध्ये का अर्ज केला या कारणावरून शिवीगाळ करून त्यांच्या वडिलास काठीने व आईस पायावर व डोक्यात दुखापत करून जीवे मारण्याची धमकी दिली़ या प्रकरणी वसंत भिसे, अनंता भिसे, बाळू भिसे, प्रकाश भिसे, वंशास भिसे, राधाभाऊ भिसे, उध्दव भिसे, धम्मकिरण भिसे, मनोहर भिसे, भाऊराव भिसे, अतुल भिसे, देविदास भिसे, राहूल भिसे यांच्या विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे वसंत आश्रोबा भिसे यांनी दिलेल्या परस्पर विरोधी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या घरासमोर जावून गैरकायदयाची मंडळ जमून हातात लोखंडी गज व काठया घेवून आरोपींनी तुम्ही आमची पानटपरी का उचलतात म्हणून आमच्या मागे लागता, असे म्हणत शिवीगाळ करत मारहाण केली़ तसेच सोडविण्यासाठी आलेल्यांनाही लोखंडी गजाने डोक्यात मारहाण केली़ या तक्रारीवरून जीवन रावसाहेब आकात, मोहन जीवन आकात, शिवाजी जीवन आकात, गिरीष जीवन आकात, सुभाष जीवन आकात, राजेभाऊ जीवन आकात, सुभाष बबन भिसे, किशोर बबन भिसे, सुमनबाई जीवन भिसे, विमल जीवन आकात यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या घटनेतील जखमींना सेलू येथे उपचार केल्यानंतर पाचजणांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गुरूदत्त माढेकर यांनी दिली़ (प्रतिनिधी)