छत्रपती संभाजीनगर : कमी पावसाचा प्रदेश असलेल्या मराठवाड्याला कायम दुष्काळाचा सामना करावा लागतो. मागास मराठवाड्याला विकसित करण्यासाठी औद्योगीकरण हा एक उत्तम पर्याय आहे. यातून आजपर्यंत मराठवाड्यात लहान, मोठ्या ६५ औद्योगिक वसाहती स्थापन करण्यात आलेल्या आहेत. मात्र आगामी काळात उद्योगजगताकडून भूखंडांची मागणी वाढणार असल्याचे लक्षात घेत आणखी १७ नवीन औद्याेगिक वसाहती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) प्रस्तावित केल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर ऐंशीच्या दशकापासून आशिया खंडातील सर्वाधिक वेगाने वाढणारे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. ऑरिक सिटींतर्गत दिल्ली, मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी)मुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा औद्योगिक ‘बूम’ आला आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी येथे सुमारे १ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. असे असले तरी शहरालगतच्या जुन्या औद्योगिक वसाहतींमध्ये भूखंड शिल्लक नाहीत. मात्र आजही उद्योजकांकडून भूखंडाची मागणी होत असते. हे चित्र मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत आहे. मराठवाड्यात एमआयडीसीचे छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि नांदेड या तीन प्रादेशिक कार्यालयांतर्गत सध्या लहान, मोठ्या ६५ एमआयडीसी स्थापित आहेत. यासोबतच कृषी उत्पादनावर अधारित उद्योग उभारण्यासाठी नवीन वसाहतींचीही मागणी लोकप्रतिनिधींकडून होत असते. या सर्व बाबींचा विचार करून एमआयडीसीने मराठवाड्यात १७ नवीन औद्योगिक वसाहती स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावित एमआयडीसीकरिता शासकीय आणि खाजगी जमिनीचा वापर होईल.
जिल्हा-- प्रस्तावित एमआयडीसीचे नाव-- क्षेत्र हेक्टरमध्येछत्रपती संभाजीनगर१) आरापूर-- ७६२.०३२) सिल्लोड-- ६९०.९१३) सटाणा- १३८.८१
----------------------बीड जिल्हा१) सिरसाळा टप्पा २- ५०२) पुसरा- ५०३) पिंप्री आष्टी- ४३.४१४) गेवराई (आहेर वाहेगाव)- १५.०९५) अंबाजोगाई-- ८०६) केज-- १६
--------------------------जालनाजालना टप्पा ५(शेलगाव, हलदोला गाव ) --- ३६९.१४
----------------------लातूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत ८ वसाहती प्रस्तावितधाराशिव जिल्हाकौडगाव ३८०वडगाव- ८०अतिरिक्त- भूम, वाशी, तामलवाडी,नळदुर्गलातूर जिल्ह्यातील चाकूर, उदगीर, जळकोट
सोयीसुविधा उपलब्ध केल्यावर भूखंड वाटपअनेक औद्योगिक वसाहतीमध्ये भूखंड शिल्लक नाही. उद्योजकांकडून मागणी होत असते. भविष्यातील मागणीचा विचार करून आपण छत्रपती संभाजीनगर आणि लातूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत १७ नवीन एमआयडीसी प्रस्तावित आहेत. जमीन भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जमीन ताब्यात घेऊन तेथे औद्योगिक सोयीसुविधा उपलब्ध केल्यावर भूखंड वाटप करण्यात येतील.- अमित भामरे, प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर